माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जम्मू विद्यापीठाच्या 36 व्या आंतर-विद्यापीठ उत्तर विभागीय युवा महोत्सवाच्या (अंतर्नाद) समारोप समारंभात मुख्य अतिथी म्हणून अनुराग ठाकूर यांची उपस्थिती
Posted On:
04 FEB 2023 10:14PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी आज सांगितले की, भारत आता जगातील 'स्टार्ट-अप' परिसंस्थेचे केंद्र झाले आहे. 90,000 'स्टार्ट-अप', 30 अब्ज डॉलर्स किमतीच्या 107 युनिकॉर्न कंपन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जे केवळ भारतातील तरुणांच्या योगदानामुळे शक्य झाले आहे. जम्मू विद्यापीठाच्या, ‘जोरावर सिंग सभागृहात’ असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) च्या संयुक्त विद्यमाने आयोजित 36 व्या आंतर-विद्यापीठ उत्तर विभागीय युवा महोत्सवाच्या (अंतर्नाद) समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या भाषणादरम्यान ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारताकडे जग मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, कारण भारत आता लसींचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे, मोबाईल फोन आणि संरक्षण उपकरणांचा देखील तो सर्वात मोठा निर्यातदार आहे, ज्याचा अंदाज यावरून लावता येईल की, आता भारत एक लाख कोटी रुपयांच्या मोबाईल फोनची तर 16 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात यावर्षी केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून प्रत्येक क्षेत्रात सर्वत्र आघाडीवर असलेल्या न्यू इंडियाचे हे चित्र आहे, असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
या महोत्सवातील युवकांच्या विविध कामगिरीचे कौतुक करताना ठाकूर म्हणाले की, भारताला समृद्ध संस्कृती, कला आणि परंपरा असलेला मोठा इतिहास असून जगात कुठेही न दिसणारी ही संस्कृती, कला आणि परंपरा जतन करण्याची मोठी जबाबदारी या देशातील तरुणांवर आहे.
या समारोप कार्यक्रमादरम्यान, मंत्री महोदयांनी जम्मू येथील पद्मश्री पुरस्कार विजेते जितेंदर उधमपुरी, राजिंदर टिकू, एस पी वर्मा, मोहन सिंग आणि बळवंत ठाकूर यांचा सत्कार केला.
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896396)
Visitor Counter : 179