दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

महाराष्ट्र टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत  दिनांक16-03-2023

Posted On: 04 FEB 2023 5:21PM by PIB Mumbai

 

मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत  दिनांक16-03-2023  रोजी 11.00 वाजता  मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400 001 येथे आयोजित केली आहे.

निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल.

पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांची प्रकरणे, ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या  पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपल्या अर्जाच्या तीन प्रति, लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई – 400 001 ला 15-02-2023 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रुप ने (एकगठ्ठा/इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकतात. 15-02-2023 च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.  

भारतीय डाक विभाग

डाक पेंशन अदालतच्या अर्जाचा फॉर्म

क्र.

 

विषय

वैयक्तिक / निवृत्तिवेतनधारक अन्वये भरण्यात येणारे तपशील

1.

निवृत्ती / मृत्युच्यावेळी पदनामसह निवृत्तिधारकाचे / कुटुंब निवृत्तिधारकाचे नाव

 

2.

कार्यालयाचे नाव जिथून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीची तारीख

 

3

पीपीओ क्रमांक

 

4

पोस्टऑफिसचे नाव जिथे पेंशन घेतली जात आहे.

 

5

निवृत्तिवेतनधारकाचा पोस्टाचा पत्ता

दूरध्वनी सोबत.

 

6

थोडक्यात तक्रार

(जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा.)

 

7

व्यक्ती / निवृत्तिवेतनधारकांची सही आणि दिनांक

 

 

 

***

M.Chopade/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896310) Visitor Counter : 178


Read this release in: English