ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

बीआयएस परदेशी उत्पादक प्रमाणन योजनेअंतर्गत, 29 परदेशी खेळणी उत्पादन कंपन्यांना देण्यात आले  परवाने,  चीनमधील कोणत्याही कंपनीला परवाना नाही

Posted On: 03 FEB 2023 3:32PM by PIB Mumbai

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग) बीआयएस  कायदा, 2016 च्या कलम 16 अंतर्गत. जारी केलेल्या खेळणी (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2020 अनुसार,1 जानेवारी 2021 पासून खेळण्यांची सुरक्षा ही भारतीय मानक ब्युरोच्या  (बीआयएस ) प्रमाणपत्राखाली अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

या आदेशानुसार, बीआयएस (सुसंगत मूल्यांकन ) विनियम, 2018 च्या परिशिष्ट -II च्या योजना -I नुसारखेळण्यांच्या सुरक्षेसाठी संबंधित भारतीय मानकांचे पालन करणे आणि बीआयएसच्या परवान्याखाली ,भारतीय मानक ब्युरो (बीआयएस ) मानक चिन्ह धारण करणे खेळण्यांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.

बीआयएस कायदा, 2016 च्या कलम 17 सह  या गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार,   कोणतीही व्यक्ती आयएसआय चिन्हाशिवाय कोणत्याही खेळण्याचे  उत्पादन, आयात, वितरण, विक्री, भाड्याने, भाडेपट्ट्याने देण्यासह  साठवणूक किंवा विक्रीसाठी प्रदर्शित करू शकत नाही.

बीआयएस  उत्पादन प्रमाणन योजनेअंतर्गत म्हणजेच बीआयएस  (सुसंगत मूल्यांकन ) विनियम, 2018 च्या परिशिष्ट -II च्या योजना -I अंतर्गत, संबंधित भारतीय मानकांनुसार, उत्पादनावर मानक चिन्ह वापरण्यासाठी उत्पादन कंपन्यांना  परवाना दिला जातो. त्यानुसार,खेळणी उत्पादक कंपन्यांसह भारतात खेळणी निर्यात करणार्‍या परदेशी उत्पादन कंपन्यांना खेळण्यांच्या सुरक्षिततेसाठी बीआयएस  परवाना घेणे आवश्यक आहे.

बीआयएस परदेशी उत्पादक प्रमाणन योजनेअंतर्गत, खालील देशांमधील परदेशी खेळणी उत्पादन कंपन्यांना  29 परवाने मंजूर करण्यात आले आहेत. (तक्ता 1 पहा)

वर्ष 2021-22 मध्ये 3 आणि उर्वरित 26 परवाने 2022-23 मध्ये मंजूर करण्यात आले आहेत.चीनमधील कोणत्याही कंपनीला  परवाना देण्यात आलेला नाही.

 

Table 1: List of foreign licences granted for toy

Country

Licence granted

1. Hungary

2

2. Indonesia

3

3. Malaysia

4

4. Thailand

2

5. Vietnam

                     16

6. Sri Lanka

1

7. Czech Republic

2

     Total

30

 

खेळण्यांसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश 01.01.2021 रोजी लागू झाला, त्यानंतर बीआयएसच्या माध्यमातून शोध आणि जप्ती मोहिमा राबवण्यात आल्या. तोपर्यंत बनावट/आयात केलेल्या खेळण्यांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. बीआयएसने राबवलेल्या  शोध आणि जप्ती मोहिमांदरम्यान, 2021-22 आणि 2022-23 (25 जानेवारी 2023 पर्यंत) या वर्षात अनुक्रमे 9565 आणि 30229  खेळणी जप्त करण्यात आली.

खेळण्यांसाठी असलेल्या  गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे (क्यूसीओ) उल्लंघन केल्याबद्दल, वर्ष 2021-22 आणि 2022-23 मध्ये अनुक्रमे 40 आणि 60 शोध आणि जप्ती मोहिमा राबवण्यात आल्या.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896078) Visitor Counter : 137


Read this release in: English , Urdu , Tamil