वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सरकारी ई-बाजारपेठ (जीईएम) पोर्टलवर, शेवटच्या टोकावरील सरकारी खरेदीदार, विक्रेते आणि सेवा प्रदात्यांना सहाय्य करण्यासाठी 5.2 लाखांहून अधिक सामायिक सेवा केंद्रे (सीएससी) आणि सुमारे 1.5 लाख भारतीय टपाल कार्यालयांना दिले जात आहे प्रशिक्षण
Posted On:
03 FEB 2023 5:24PM by PIB Mumbai
जीईएम पोर्टलवर शेवटच्या टोकावरील खरेदीदार/विक्रेता नोंदणी, उत्पादन यादी अपलोड आणि व्यवस्थापन करण्यासाठी, मागणी स्वीकारण्यासह, मागणीची पूर्तता करणे आणि देयक निर्मिती कार्यक्षमतेसह सरकारी खरेदीदार, विक्रेते आणि सेवा प्रदात्यांना सहाय्य करण्यासाठी भारतभरातील 5.2 लाखांहून अधिक सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) आणि सुमारे 1.5 लाख भारतीय टपाल कार्यालयांना प्रशिक्षित केले जात आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
उत्पादनांचे छायाचित्रण, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि स्पीड पोस्ट आणि बिझनेस पार्सलद्वारे उत्पादन पाठवणे यासारख्या मूल्यवर्धित सेवा इंडिया पोस्ट संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रदान केल्या जातील. विक्रेते आणि सेवा प्रदात्यांना ,सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) आणि टपाल विभागाने निश्चित केलेल्या शुल्कावर ऑनलाइन, मुद्रीत आणि कार्यालय संप्रेषण चॅनेल्स देखील वितरित केले जातील. सीएससीच्या माध्यमातून देऊ केल्या जाणार्या जीईएम सेवा सर्व सरकारी खरेदीदारांना कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध करून दिल्या जातील.
पॅकेजिंग साहित्याचे आणि स्पीड पोस्ट आणि बिझनेस पार्सलद्वारे पाठवण्यात येणाऱ्या उत्पादनांचे दर इंडिया पोस्ट संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन, मुद्रित आणि कार्यालय संप्रेषण चॅनेल्सच्या माध्यमातून सीएससीसह सामायिक केले जातील.
इंडिया पोस्ट पॅकेजिंग सामग्रीसह बॉक्स, बीओपीपी टेप, बबल-रॅप, फ्लायर्स आणि एअर सॅक जवळच्या टपाल कार्यालय साठवणूक ठिकाणी उपलब्ध असल्याची खातरजमा टपाल विभागाच्या माध्यमातून केली जाईल, टपाल खात्याने निश्चित केलेल्या मानकांनुसार स्पीड पोस्ट आणि बिझनेस पार्सल पिकअप, परिवहन आणि वितरण सुलभ करण्यासह सर्व जेईएम लेबल लावलेल्या पॅकेजेसची प्राधान्य प्रक्रिया सुनिश्चित करेल.
- खालील सेवांसाठी विक्रेते/सेवा प्रदात्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही;
- एक-राज्य आणि बहु-राज्य सहकारी संस्थांसाठी -खरेदीदार नोंदणी
- विक्रेता नोंदणी आणि खाते अद्यतन करणे (सर्व केवायसी तपशीलांसह)
- विक्रेते आणि सेवा-प्रदात्यांनी खालील सेवांसाठी भरायचे शुल्क;
- उत्पादन/सेवा कॅटलॉग अपलोड आणि व्यवस्थापन, आणि
- प्रत्यक्ष मूल्यवर्धित सेवा (सीएससी आणि इंडिया पोस्ट येथे पॅकेजिंग आणि लॉजिस्टिक्स)
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896057)
Visitor Counter : 213