संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डीआरडीओ चे प्रकल्प

Posted On: 03 FEB 2023 3:47PM by PIB Mumbai

 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) च्या प्रकल्पांवर केंद्र सरकारने मिशन मोडवर काम केले आहे. आजमितीला   डीआरडीओ, 55 प्रकल्पांवर काम करत असून त्यासाठी एकूण 73,942.82 कोटी रुपयांचा खर्च  मंजूर करण्यात आला आहे.

डेकोइज, आण्विक संरक्षण तंत्रज्ञान, एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी), कॉम्बॅट सूट, प्रोपल्शन सिस्टीम, एअर ड्रॉपेबल कंटेनर, टॉर्पेडो, लढाऊ विमान,क्रूझ क्षेपणास्त्र, मानवरहित हवाई वाहन, AEW&C विमान प्रणाली, गॅस टर्बाइन इंजिन, असॉल्ट रायफल, वॉरहेड, लाइट मशीन गन, रॉकेट, प्रगत इतर वाहनाने वाहून नेता येणारी आर्टिलरी गन सिस्टम (ATAGS),इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल कमांड, ऑर्डनन्स डिस्पोजल सिस्टीम,टॅक्टिकल रेडिओ,EW सिस्टीम,रडार्स,जीवन रक्षक प्रणाली,भौगोलिक माहिती प्रणाली, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र,जहाजविरोधी क्षेपणास्त्र,अँटी एअरफील्ड वेपन,ग्लाईड बॉम्ब,सिम्युलेटर इत्यादी क्षेत्रात हे प्रकल्प कार्यरत आहेत.

संरक्षण  राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज लोकसभेत कोमती रेड्डी व्यंकट रेड्डी आणि इतरांना लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Patil/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1896008) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Tamil