पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मॅंगनीज ओर (इंडिया) लिमिटेडच्या (एमओआयएल) नफ्यात आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत 55 टक्क्यांची वाढ


मॅंगनीजचे उत्पादन 2.41 लाख टनांवरून 3.37 लाख टन इतके वाढले

प्रविष्टि तिथि: 02 FEB 2023 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2023

 

मॅंगनीज ओर (इंडिया) लिमिटेडच्या  (एमओआयएल) संचालक मंडळाने 31 जानेवारी 2023 रोजी 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या आर्थिक निकालांना मान्यता दिली.

तिसऱ्या तिमाहीत, कर भरल्यानंतरचा नफा (पीएटी) 39.52 कोटी रुपये असून तो आर्थिक वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 45% ने जास्त आहे. कंपनीने याच कालावधीत 2.41 लाख टन मॅंगनीजच्या तुलनेत 3.37 लाख टन उत्पादन केले असून त्यात 40% वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत मॅंगनीज धातूची विक्री 44% वाढली असून ती 2.06 वरून 2.97 लाख टनांवर पोहचली आहे. याच कालावधीत कार्यान्वयनातील महसुलात 28% वृद्धि  दिसून आली. तो 236 कोटी वरुन 302 कोटींवर पोहचला आहे. 

तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला पावसाळा लांबला तरीही नऊ महिन्यांच्या कालावधीत, उत्पादन 5% वाढले. ते 8.57 वरून 9.00 लाख टनांपर्यंत पोहचले आहे.

एमओआयएल मंडळाने आर्थिक वर्ष 2023 साठी प्रत्येकी 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यावर प्रति समभाग 3 रुपये अंतरिम लाभांशही जाहीर केला आहे. तो एकूण 61.05 कोटी रुपये होतो. 

"कंपनी येत्या काही महिन्यांत आणखी चांगली कामगिरी नोंदवण्यासाठी सज्ज झाली आहे,"  असे एमओआयएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अजित कुमार सक्सेना म्हणाले.

एमओआयएल लिमिटेड ही भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सूची-अ मधील मिनीरत्न श्रेणी-1 सीपीएसई आहे. एमओआयएल ही देशातील सर्वात मोठी मॅंगनीज धातू उत्पादक कंपनी असून तिचा ज्याचा बाजारातील हिस्सा 45% आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यात ती अकरा खाणी चालवते. 2030 पर्यंत उत्पादन जवळपास दुप्पट करून 3.00 दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचे 

कंपनीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. एमओआयएल मध्य प्रदेश राज्यातील इतर क्षेत्रांव्यतिरिक्त गुजरात, राजस्थान आणि ओडिशा राज्यांमध्येही व्यवसायाच्या संधी शोधत आहे.

 

* * *

S.Bedekar/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1895708) आगंतुक पटल : 260
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , Tamil