अर्थ मंत्रालय

जानेवारी 2023 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च जीएसटी संकलन, संकलनाचा ऑक्टोबर 2022 च्या विक्रमाला टाकले मागे


जानेवारी 2023 मध्ये जीएसटी द्वारे एकूण 1,55,922 कोटी रुपये महसूल प्राप्त

एप्रिल 2022 मधील 1.68 लाख कोटी रुपयांच्‍या एकूण जीएसटी संकलना नंतरचे आतापर्यंतचे सर्वोच्च जीएसटी संकलन

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जीएसटी संकलनाने तिसऱ्यांदा 1.50 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

Posted On: 31 JAN 2023 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2023

 

जानेवारी 2023 मध्ये 31.01.2023 रोजी संध्याकाळी 5:00 पर्यंत जीएसटी (GST) अर्थात वस्तू आणि सेवा करा द्वारे जमा झालेला एकूण महसूल 1,55,922 कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी सीजीएसटी रु 28,963 कोटी, एसजीएसटी रु 36,730 कोटी, IGST रु. 79,599 कोटी (माल आयातीवर गोळा केलेल्या 37,118 कोटी रु.सह) आहे, आणि उपकर रु. 10,630 कोटी (माल आयातीवर जमा झालेल्या रु. 768 कोटींसह) आहे. सरकारने नियमित थकबाकीच्या स्वरुपात, आयजीएसटी मधून सीजीएसटीला 38,507 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 32,624 कोटी रुपये दिले आहेत. नियमित थकबाकी नंतर जानेवारी 2023 मधील केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटी साठी 67,470 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 69,354 कोटी रुपये आहे.  

चालू आर्थिक वर्षात जानेवारी 2023 पर्यंत जीएसटी द्वारे जमा झालेला महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीतील महसुलापेक्षा 24% जास्त आहे. या कालावधीत वस्तूंच्या आयातीमधून जमा झालेला महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत  29% अधिक आहे तर देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) जमा झालेला महसूल 22% अधिक आहे.

चालू आर्थिक वर्षात तिसऱ्यांदा जीएसटी संकलनाने 1.50 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. जानेवारी 2023 मधील जीएसटी संकलन एप्रिल 2022 मध्ये नोंद झालेल्या संकलनानंतरचे सर्वोच्च संकलन आहे. डिसेंबर 2022 मध्ये, ई-वे बिलांच्या माध्यमातून 8.3 कोटी रुपये महसूल जमा झाला, जो आतापर्यंतचा सवोच्च आहे, आणि नोव्हेंबर 2022 मध्ये ई-वे बिलां द्वारे जमा झालेल्या 7.9 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. गेल्या वर्षभरात, कराची पायाभूत पातळी वाढवण्यासाठी आणि अनुपालन सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले गेले. गेल्या काही वर्षांमध्ये महिना अखेरीपर्यंत जीएसटी परतावा (GSTR-3B) आणि पावत्यांची थकबाकी (GSTR-1) भरण्याची टक्केवारी लक्षणीयरीत्या सुधारली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत रिटर्न फाइलिंगचा (परतावा भरण्याचा) कल खालील आलेखामध्ये दाखवला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत, त्या पुढील महिन्याच्या अखेरी पर्यंत एकूण 2.42 कोटी जीएसटी परतावा भरला गेला,  मागील वर्षी याच तिमाहीत तो 2.19 कोटी रुपये इतका होता. अनुपालन सुधारण्यासाठी वर्षभर लागू करण्यात आलेल्या विविध धोरणात्मक बदलांचा हा परिणाम आहे.

खालील तक्ता चालू वर्षात जीएसटी द्वारे जमा झालेल्या एकूण मासिक महसुलाचा कल दर्शवितो.

* * *

S.Thakur/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1895210) Visitor Counter : 491


Read this release in: Urdu , English