माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एससीओ चित्रपट महोत्सवाचा मुंबईत शुभारंभ
एससीओ देशांमध्ये चित्रपट क्षेत्रविषयक भागीदारी करण्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे आवाहन
मान्यवरांच्या उपस्थितीत "भारत है हम" अॅनिमेशन मालिकेचा प्रोमो प्रदर्शित
Posted On:
28 JAN 2023 8:33PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मुंबईत आयोजित पाच दिवसीय एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचा शुक्रवारी संध्याकाळी शुभारंभ झाला.


माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, हा महोत्सव या प्रदेशातील देशांदरम्यान सिनेमॅटिक भागीदारी निर्माण करण्याची एक अनोखी संधी प्रदान करणार आहे. सदस्य देशांनी चित्रपट क्षेत्रविषयक भागीदारी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

'भारत है हम' अॅनिमेशन मालिकेचा प्रोमो प्रदर्शित

या कार्यक्रमात ‘भारत है हम’ या अॅनिमेशन मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनने ग्राफिटी मीडियाच्या सहकार्याने तयार केलेली ही 52 भागांची मालिका, आपल्या सर्वात अमूल्य प्रेक्षकांना, म्हणजेच लहान मुलांना, ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची कथा सांगते. आझादी का अमृत महोत्सव बॅनरखालील बनवण्यात आलेल्या या मालिकेमध्ये, मुंजाल श्रॉफ आणि तिलक शेट्टी यांनी तयार केलेली क्रिश, त्रिश आणि बाल्टिबॉय ही आकर्षक कार्टून पात्रे, सूत्रधाराच्या भूमिकेत, या कथा सादर करतात. प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांचा आवाजही यात ऐकायला मिळेल.

***
S.Kakade/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1894364)
Visitor Counter : 203