कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुढील निवडणुकीत प्रथमच मतदान करून आपल्या जीवनातील निवडणुकीच्या टप्प्याला आरंभ करणार्‍या मतदारांना 2047 मध्ये ज्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी भारतीय लोकशाहीला आकार देण्याची भाग्यशाली संधी मिळाली आहे : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 25 JAN 2023 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023
 

पुढील निवडणुकीत प्रथमच मतदान करून आपल्या जीवनातील निवडणुकीच्या टप्प्याला आरंभ  करणार्‍या मतदारांना 2047 मध्ये ज्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी भारतीय लोकशाहीला आकार देण्याची भाग्यशाली संधी मिळाली आहे,असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान;  राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान;  पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, या वर्षी मतदान करण्यासाठी वयाची पात्रता गाठणाऱ्या तरुणांच्या मेळाव्याशी संवाद साधताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाला पुष्टी देत म्हटले की, भारत ही केवळ सर्वात मोठी जगातील लोकशाही नाही, तर सर्व लोकशाहींची जननी आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पहिल्यांदाच मतदान करणार्‍यावर एक विशेष जबाबदारी आहे कारण ते पुढील 25 वर्षांच्या निर्णायक काळात भारताचे नेतृत्व करणार आहेत, ज्याचे पंतप्रधान मोदी 'अमृत काल' म्हणून वर्णन करतात आणि त्यानंतर भारत जगासमोर एक आघाडीचे राष्ट्र म्हणून उभे राहील.त्यामुळे या तरुणांनी शांतचित्ताने आणि वैज्ञानिक अचूकतेने त्यांचे भविष्य आणि आगामी काळातील भारताचे भवितव्य कोणी ठरवायचे आहे,यांचा निर्णय घ्यायचा आहे.

डॉ जितेंद्र सिंह यांनी नमूद केले, की भारताबरोबरच लोकशाहीचा प्रवास सुरू करणारे इतर अनेक देश स्वतःला टिकवून ठेवण्यात अपयशी ठरले आणि सुकून गेले, तेव्हा भारतानेच एक राष्ट्र म्हणून आपली लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुरेशी लवचिकता, सामर्थ्य आणि दृढनिश्चय दाखवला आहे.केवळ सामर्थ्यवान बनण्यासाठीच नाही तर जगातील इतर देशांसाठी एक आदर्श देखील आहे.सरकारच्या सर्वोच्च पदावर नरेंद्र मोदींचा होत असलेला उदय भारतीय लोकशाहीच्या खऱ्या भावना अधोरेखित करतो, कारण यामुळे समाजाच्या कोणत्याही स्तरातील आई आपल्या मुलाने किंवा मुलीने उच्च पदावर पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा बाळगू शकते,असेही ते पुढे म्हणाले.

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893822) Visitor Counter : 142


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu