भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक - मतदानाच्या तारखेत बदल


निवडणूक 26 फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी 2 मार्च रोजी

Posted On: 25 JAN 2023 8:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023

केंद्रीय निवडणूक आयोगाने 18.01.2023 च्या प्रसिद्धीपत्रक क्रमांक ECI/PN/2/2023 द्वारे अरुणाचल प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू मधील विधानसभेच्या आणि केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपच्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता, ज्यात मतदानाची तारीख 27.02.2023 (सोमवार) निश्चित करण्यात आली आहे आणि मतमोजणीची तारीख 02.03.2023 (गुरुवार) आहे.

2. त्यानंतर, महाराष्ट्रातील, पुणे जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी पोटनिवडणूक होत असलेल्या विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवरील मतदानाची तारीख आणि एचएससी म्हणजे 12 वी ची परीक्षा आणि पदवीधर पदवी परीक्षेची तारीख एकच असल्याचा अहवाल दिला आहे.

3. परिणामी, आयोगाने या बाबतची प्रत्यक्ष परिस्थिती आणि विषयाशी निगडित इतर सर्व बाबींचा विचार करून, महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ 205- चिंचवड आणि 215-कसबा पेठ या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या तारखेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

निवडणूक 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

02.03.2023 (गुरुवार) रोजी मतमोजणी होणार आहे.

04.03.2023 (शनिवार) पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

 

 

 

 

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893773) Visitor Counter : 724


Read this release in: English , Urdu , Hindi