शिक्षण मंत्रालय
जिल्हा पातळीवरील ‘परीक्षा पे चर्चा 2023’ चित्रकला स्पर्धेचे गोव्यात आयोजन
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2023 4:46PM by PIB Mumbai
गोवा, 23 जानेवारी 2023
‘परीक्षा पे चर्चा 2023’ निमित्त, आज गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘एक्झाम वॉरियर्स’ या संकल्पनेवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते विजेत्यांन पारितोषिक प्रदान करण्यात आले.

दक्षिण गोव्यातील शाळांसाठी केंद्रीय विद्यालय क्रमांक-1, वास्को आणि उत्तर गोव्यातील शाळांसाठी आयएनएस मांडवी केंद्रीय विद्यालय या दोन शाळा नोडल केंद्र होत्या. दोन्ही शाळांमध्ये झालेल्या चित्रकला स्पर्धेत 200 बालकांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाची प्रत देण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेसंदर्भातील ताण कमी होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधानांनी अतिशय विचारपूर्वक परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन ‘परीक्षा पे चर्चा 2023’ च्या अनुषंगाने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेविषयी आनंद व्यक्त केला. अशाप्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून परीक्षेसंदर्भातील ताण कमी होण्यास आणि कल्पकतेला चालना देण्यास मदत होईल, असे सांगितले.

27 जानेवारी रोजी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर होणाऱ्या भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गोव्यातील दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक यांची यासाठी निवड झाली आहे.
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1893016)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English