विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भोपाळमध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे(IISF-2022) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संयुक्तपणे केले उद्घाटन

Posted On: 21 JAN 2023 9:45PM by PIB Mumbai

 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भोपाळमध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (IISF-2022) संयुक्तपणे उद्घाटन केले. विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेषासह अमृत काळाच्या दिशेने आगेकूच ही या महोत्सवाची संकल्पना आहे.

मध्य प्रदेशमध्ये केवळ एका वर्षात 2600 स्टार्ट अप्स उदयाला आले आहेत आणि हे केवळ इंदूर या शहरांपुरते मर्यादित नाहीत तर द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्येही स्टार्ट अप्स यशस्वीरित्या तयार झाले आहेत, असे शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या भाषणात सांगितले. नवोन्मेषाचा ध्यास निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी मध्य प्रदेशातील विद्यार्थी आणि उद्योजकांना केले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले की क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात भारत मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे, ज्या तंत्रज्ञानामुळे जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरील वास्तवातील उत्तरे शोधण्यासाठी भावी विज्ञानावर प्रभाव निर्माण होईल. 2047 मध्ये ज्यावेळी भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल त्यावेळी   तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भारताच्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  जून 2020 मध्ये अवकाश क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुलं केल्यावर केवळ दोन वर्षात भारतात सुमारे 120 डीप टेक स्पेस स्टार्ट अप्स तयार झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. स्पेस स्टार्ट अप्स केवळ रॉकेट्स अवकाशात पाठवत नाही आहेत तर उपग्रहांची निर्मिती, अवकाश कचरा व्यवस्थापन आणि दैनंदिन आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या उपयुक्त सामग्रीच्या क्षेत्रात काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1892762) Visitor Counter : 201


Read this release in: English , Urdu , Hindi