श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

नोव्हेंबर 2022मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत 16.26 लाखांची वाढ


नव्याने सदस्यत्व घेतलेल्यांमध्ये 18 ते 25 या वयोगटातील सदस्यांचे प्रमाण 56.60 टक्के, हे प्रमाण म्हणजे पहिल्यांदाच रोजगाराच्या कक्षेत येत असलेले नागरीक, मोठ्या प्रमाणात संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट होत असल्याचे निर्देशक

संघटीत कामगार क्षेत्रातील महिलांच्या निव्वळ सदस्य संख्येत नोव्हेंबर 2021च्या तुलनेत नोव्हेंबर 2022मध्ये 7.90% इतकी वाढ

Posted On: 20 JAN 2023 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2023

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पगारी कर्मचाऱ्यांच्या सदस्य संख्येविषयीची अंदाजित आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2022 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसोबत 16.26 लाख इतके निव्वळ कर्मचाऱ्यांनी सदस्यत्व घेतले आहे. या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत नोव्हेंबर 2022 मध्ये सदस्यत्व घेण्याचे प्रमाण 25.67% वाढ झाली आहे. या आकडेवारीची वार्षिक तत्वानुसार तुलना केली तर 2021च्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत 2022 च्या नोव्हेंबरमध्ये निव्वळ सदस्यसंख्येत 16.50% इतकी वाढ झाली आहे.

नोव्हेंबर 2022 मध्ये एकूण 16.26 लाख जणांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्यत्व घेतले. यांपैकी सुमारे 8.99 लाख इतक्या नव्या सदस्य पहिल्यांदाच ईपीएफओच्या कक्षेत आले आहेत. यातून संघटनेचे नव्याने सदस्य घेण्याचे प्रमाण ऑक्टोबर 2022च्या तुलनेत 1.71 लाखाने वाढले आहेत. ऑक्टोबर 2022मध्ये हीच संख्या 7.28 लाख इतकी होती. या नव्या सदस्यांमध्ये 18ते 21 या वयोगटातील सदस्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 2 लाख 77 हजार इतकी असून, 22 ते 25 या वयोगटातील 2 लाख 32 हजार जणांनी सदस्यत्व घेतले आहे. नव्याने सदस्यत्व घेतलेल्यांमध्ये 18 ते 25 या वयोगटातील सदस्यांचे प्रमाण 56.60 इतके आहे. यातून पहिल्यांदाच रोजगाराच्या कक्षेत येत असलेले नागरीक, मोठ्या प्रमाणात संघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये समाविष्ट होत असल्याचे दिसून आले आहे.

यासोबतच आधी सदस्यत्व घेतलेल्या सुमारे 11.21 जणांनी पुन्हा एकदा सदस्यत्व घेतले आहे. या सदस्यांनी आपली नोकरी बदलली आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसोबत जोडलेल्या आस्थापनांमध्येच पुन्हा नवी नोकरी सुरू केली, तसेच नोकरी सोडताना सदस्यत्वापोटी त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम काढून घेण्याऐवजी ती हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडला, यामुळे त्यांची सामाजिक सुरक्षाही अधिक बळकट झाली आहे.

या माहितीसाठ्याचे लिंगनिहाय विश्लेषण केल्यानंतर, त्यात असे आढळून आले की, नोव्हेंबर 2022 मध्ये निव्वळ महिला सदस्य नोंदणी संख्येत ऑक्टोबर 2022च्या तुलनेत. 0.56 लाखांनी वाढ झाली.  नोव्हेंबर 2022 मध्ये ही संख्या 3.19 लाख इतकी तर ऑक्टोबर 2022 मध्ये 2.63 लाख इतकी होती.

गुजरात, हरयाणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये निव्वळ सदस्यवाढीचा दरात प्रत्येक महिन्यात वाढ होत असल्याचे राज्यनिहाय आकडेवारीत आढळले आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या एकूण सदस्य नोंदणीपैकी 58.23 टक्के सदस्य हे या 6 राज्यांमधले आहेत. या सर्व राज्यांमध्ये 20 टक्के सदस्य नोंदणीसह महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून त्यानंतर 10.91 टक्के सदस्यवाढीसह तामिळनाडूचा क्रमांक आहे.


R.Aghor/T.Pawar/P.Malandkar
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1892604) Visitor Counter : 173


Read this release in: English , Urdu , Hindi