वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मार्गदर्शन कौशल्यात अधिक नैपुण्य आणण्याच्या उद्देशाने मुंबईतील मार्गदर्शकांसाठी ‘स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताह’ या मास्टरक्लासचे आयोजन


‘मार्ग’ मंचाच्या माध्यमातून उद्योजक आणि मार्गदर्शकांना सहभागी होऊन संशोधन करण्यासाठी नव्या मार्गांची निर्मिती

Posted On: 13 JAN 2023 9:15PM by PIB Mumbai

मुंबई, 13 जानेवारी 2023

 

सध्या सुरु असलेल्या स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचा भाग म्हणून, केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने झोन स्टार्ट अप्स इंडियाच्या पाठबळासह आज मुंबईत शेअर बाजार येथे ‘मार्ग’ मार्गदर्शक मास्टरक्लासचे आयोजन केले.  स्टार्ट अप उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या प्रभावी मार्गांबाबत उद्योग जगतातील मान्यवरांना सक्षम करणे तसेच त्यांच्या ज्ञानात भर घालणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. प्रत्यक्ष तसेच आभासी अशा दोन्ही पद्धतींनी उत्सुक मार्गदर्शक या कार्यशाळेला उपस्थित राहिले.

तांत्रिक सत्रांमध्ये ज्या वक्त्यांनी मार्गदर्शन केले त्यांच्यामध्ये बीहाइव्ह कॅपिटलचे भूषण गजारिया आणि फंडएनॅबलचे विक्रांत पोतनीस यांचा समावेश होता. भूषण यांच्या मार्गदर्शनपर सत्रात, परिणामकारक मार्गदर्शनासाठी योग्य आराखड्याचा स्वीकार करण्यावर अधिक भर देण्यात आला होता तर पोतनीस यांनी या सत्रात सहभागी मार्गदर्शकांशी संवाद साधून उद्योजकांना भांडवल कसे उभारून देता येईल, निधी पुरवठ्याचे विविध मार्ग तसेच व्यवसायाच्या योजना आणि आर्थिक बाबींच्या पलीकडे जाऊन प्रतिसाद कसा मिळवता येईल याबाबत चर्चा केली. या मास्टरक्लासमध्ये सीआयबीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मेनन यांच्या नेतृत्वाखाली ‘व्हॉट फाउंडर्स एक्स्पेक्ट फ्रॉम मेंटॉर्स’ या विषयावरील गटचर्चा देखील घेण्यात आली. या चर्चेत मार्गदर्शनाबद्दलच्या अपेक्षांचे विविध पैलू उजेडात आले.

एकशे चाळीसपेक्षा जास्त ‘मार्ग’ मार्गदर्शक तसेच स्टार्ट अप उद्योगांना त्यांच्या उद्योजकीय प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या आकांक्षित मार्गदर्शकांनी या कार्यशाळेत भाग घेतला.सध्या कार्यरत असलेले आणि भविष्यात मार्गदर्शन करू इच्छिणारे यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने भरवलेल्या या कार्यशाळेत ‘मार्ग’ पोर्टलबद्दल जाणीव निर्मिती देखील करण्यात आली. अधिक मोठ्या परिसंस्थेच्या उभारणीसाठी मार्गदर्शकांना एकमेकांशी जोडून घेण्यात तसेच ‘मार्ग’पोर्टलवरील मार्गदर्शकांना सहभागी करून घेण्यात यश आले.  

MAARG ‘मार्ग’ (मार्गदर्शन,सल्ला,मदत, लवचिकता आणि विकास) हा राष्ट्रीय मार्गदर्शन मंच म्हणजे विविध क्षेत्रातील, कार्य  करणारे, टप्प्यांवरील,भौगोलिकता आणि विभाग यांच्यातील स्टार्ट अप्स उद्योगांना सुलभतेने मार्गदर्शन मिळण्यासाठीचा एकल मंच आहे. ‘मार्ग’ पोर्टलबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी हा स्टार्ट अप इंडियाचा स्थापना दिवस  राष्ट्रीय स्टार्ट अप दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने भारतीय स्टार्ट अप परिसंस्थेचा सोहोळा साजरा करण्यासाठी 10 जानेवारी 2023 ते 16 जानेवारी 2023 या आठवड्यात स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे आयोजन केले आहे. या संदर्भात, स्टार्ट अप उद्योगांशी संबंधित कार्यशाळा, क्षमता निर्मिती सत्रे आणि स्टार्ट अप इंडिया ने आयोजित केलेली आणि भारतातील उद्योजक परिसंस्थेच्या संदर्भात विविक्षित विषयाला वाहिलेली सत्रे आयोजित करण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्ट अप इंडिया या उपक्रमाची घोषणा केली.  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचा हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम देशात शाश्वत आर्थिक विकास साधणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण करणाऱ्या नवोन्मेष आणि स्टार्ट अप उद्योगांची जोपासना करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आला.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1891142) Visitor Counter : 164


Read this release in: Hindi , English , Urdu