गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संयुक्त जनता दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
शरद यादव यांच्या निधनाने देशाच्या सार्वजनिक जीवनाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2023 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2023
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संयुक्त जनता दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अमित शहा यांनी शरद यादव यांच्या निवासस्थानी जाऊन दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिली आणि आज नवी दिल्लीत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, शरद यादव यांच्या निधनाने देशाच्या सार्वजनिक जीवनाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

अमित शाह म्हणाले की, शरद यादव यांनी बिहार आणि भारतीय राजकारणात अनेक दशके अमूल्य योगदान दिले. शाह पुढे म्हणाले की, “या दु:खाच्या वेळी मी त्यांच्या कुटुंबीय आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. दिवंगत आत्म्यास ईश्वर आपल्या पावन चरणी स्थान देवो.”

* * *
N.Chitale/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1891060)
आगंतुक पटल : 261