ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्यूरोचे नवी मुंबईत वाशी इथे सक्तवसूली छापे
मोठ्या प्रमाणात बनावट खेळणी (प्रमाणित गुणवत्ता निकषांचे उल्लंघन करणारी) जप्त
Posted On:
12 JAN 2023 3:25PM by PIB Mumbai
मुंबई, 12 जानेवारी 2023
खेळण्याच्या निर्मितीत गुणवत्ता विषयक निकषांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय मानक ब्यूरोच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने (उपसंचालक टी अर्जुन आणि सहायक संचालक विवेक रेड्डी) काल सक्तवसुली छापे घातले. नवी मुंबईतील वाशी इथल्या मेसर्स दुआ लिमा रिटेल प्रायव्हेट लिमिटेड, इनऑर्बिट मॉल वाशी आणि मेसर्स क्रॉस वर्ल्ड बुक स्टोअर प्रायव्हेट लिमिटेड, इनऑर्बिट मॉल, वाशी. इथे घातलेल्या छाप्यांमध्ये असे उघड झाले की कंपन्या नॉन-आयएसआय म्हणजे (गुणवत्ता नियंत्रण) आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या खेळण्यांची विक्री करत आहेत. याप्रकरणी भारतीय मानक ब्यूरोने न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.


खेळणी (गुणवत्ता नियंत्रण) अध्यादेशा नुसार सर्व खेळणी आयएस 9873-1 (यांत्रिक आणि भौतिक संपत्तीसंदर्भात सुरक्षा मुद्दे) आणि आयएस 15644 (विजेवरील खेळण्यांची सुरक्षा) अंतर्गत बीआयएस प्रमाणित आणि बीआयएस परवाना क्रमांक असलेला मानक मार्क असणे अनिवार्य आहे. शोध आणि जप्ती मोहिमेदरम्यान असे उघडकीस आले की या खेळण्यांवर आयएस 9873-1 प्रमाणपत्र नव्हते. अशा प्रकारची अनेक खेळणी या धाडीदरम्यान जप्त करण्यात आली तसेच या अस्थापना, बीआयएस कायदा 2016 च्या कलम 17(1) चे उल्लंघन करून ही खेळणी विकत असल्याचे पुरावे गोळा करण्यात आले. या कलमाअंतर्गत अधिकृत परवाना आणि मानक मार्क नसल्यास अशा वस्तूंचे उत्पादन, आयात, वितरण, विक्री, भाड्याने देणे, करारावर देणे, साठवणूक करणे अथवा विक्रीसाठी प्रदर्शन करणे यावर बंदी आहे. असे केल्यास दोषींना बीआयएस कायदा 2016 च्या तरतुदींनुसार दोन वर्षांपर्यंत कारावास अथवा किमान रु 2, 00,000 दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.


ग्राहकांनी बीआयएस प्रमाणित उत्पादनांची यादी बघण्यासाठी BIS CARE ॲप (अँड्रॉइड + आयओएस वर उपलब्ध) वापरावे आणि वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यावरील आयएसआय मार्क खरा असल्याची खात्री करून घ्यावी. यासाठी http://www.bis.gov.in. या संकेतस्थळाला भेट द्या. बीआयएस प्रमाणपत्राशिवाय कुठले उत्पादन विकले जात आहे असे ग्राहकांच्या लक्षात आल्यास त्याची संबंधित अधिकाऱ्यांकडे, प्रमुख, एमयुबीओ - II, पश्चिम विभागीय कार्यालय, बीआयएस, दुसरा मजला, एनटीएच (पश्चिम विभाग), एफ - 10, एमआयडीसी, अंधेरी (पु), मुंबई - 400 093 या पत्त्यावर तक्रार करावी. तसेच hmubo2@bis.gov.in या ईमेल वर देखील तक्रार करता येऊ शकते. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.



S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1890702)
Visitor Counter : 204