सहकार मंत्रालय

राष्ट्रीय स्तरावर तीन बहु- राज्य सहकारी संस्था स्थापन करण्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

Posted On: 11 JAN 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023

 

राष्ट्रीय स्तरावर तीन बहु राज्य सहकारी संस्था स्थापन करण्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार  मानले आहेत.

सहकार हे एकमेव क्षेत्र आहे जे कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता या क्षेत्रात आहे, असे  अमित शाह यांनी केलेल्या ट्विटच्या शृंखलेत  म्हटले आहे. मात्र इतकी वर्षे या क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे  क्षेत्र बळकट करण्यास सुरुवात केली.आज मंत्रिमंडळाने या क्षेत्राच्या हिताचे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, असे शहा यांनी सांगितले.

या निर्णयामुळे सहकार क्षेत्राला नवे सामर्थ्य  मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  आभार मानतो.,असे त्यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/AmitShah/status/1613136437419061248?s=20&t=CghV0siWC0qlOUyQvRmwgQ

https://twitter.com/AmitShah/status/1613136509192015874?s=20&t=CghV0siWC0qlOUyQvRmwgQ

https://twitter.com/AmitShah/status/1613136603345747968?s=20&t=CghV0siWC0qlOUyQvRmwgQ

https://twitter.com/AmitShah/status/1613136862327238656?s=20&t=CghV0siWC0qlOUyQvRmwgQ

https://twitter.com/AmitShah/status/1613136942505549824?s=20&t=CghV0siWC0qlOUyQvRmwgQ

  

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1890559) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu