संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टेशन मुख्यालय खडकी, औंध परिसरातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 14 जानेवारी 2023 रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

Posted On: 10 JAN 2023 8:20PM by PIB Mumbai

पुणे, 10 जानेवारी 2023

 

स्टेशन मुख्यालय खडकी/औंधच्या अखत्यारीतील भागात राहणारे माजी सैनिक, वीर नारी/वीर माता यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणून, 14 जानेवारी 2023 रोजी खडकीच्या बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटरच्या भगत पॅव्हेलियन येथे माजी सैनिक (ESM) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी सैनिक, वीर नारी/वीर माता यांना सेवानिवृत्तीनंतरची फायदेशीर माहिती प्रदान करणे, तक्रारींचे निवारण करणे आणि विविध अभिलेख कार्यालयांचे प्रतिनिधी, संरक्षण खात्यांचे प्रधान नियंत्रक (निवृत्ती वेतन) अलाहाबाद, राज्य सरकारी संस्था आणि बँक अधिकारी यांच्या समन्वयाने तक्रारींचे निवारण करणे आणि कागदपत्रातील विसंगती दूर करणे, यासारखी मदत करणे, हे या मेळाव्याचे उद्दिष्ट आहे. गरजूंना आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यासाठी माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना सेलच्या समन्वयाने मिलिटरी हॉस्पिटल, खडकी अंतर्गत एक वैद्यकीय शिबीर  देखील आयोजित केले जाईल. सर्व उपस्थितांना अल्पोपहार दिला जाईल.

ही रॅली सर्व वीर नारी, वीर माता, ज्येष्ठ माजी सैनिक आणि माजी सैनिकांनी राष्ट्र, समाज आणि सशस्त्र दलांसाठी केलेल्या प्रामाणिक आणि निःस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. या रॅलीला माजी सैनिक, वीर नारी, वीर माता आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा असल्याने, माजी सैनिक आणि त्यांच्या नेक्स्ट ऑफ किन (NOK), अर्थात कुटुंबियाना दैनंदिन जीवनातील समस्यांवर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची आणि लष्कराची प्रतिमा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची संधी लष्कराला मिळणार आहे. ही रॅली, विशेषतः माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या (NOK) दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने खरोखरच एक महत्वाचे पाऊल ठरेल.   

 

* * *

PIB Pune | M.Iyengar/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1890118) Visitor Counter : 188


Read this release in: English