नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भुवनेश्वर आणि राउरकेला दरम्यानच्या दैनंदिन हवाई उड्डाणसेवेचे उद्घाटन केले
ही हवाई सेवा आगामी हॉकी विश्वचषकादरम्यान भुवनेश्वर आणि राउरकेला यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2023 10:46PM by PIB Mumbai
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज भारत सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाच्या क्षेत्रीय संपर्क योजना (RCS) उडान अंतर्गत भुवनेश्वर आणि राउरकेला दरम्यानच्या दैनंदिन हवाई उड्डाणाचे उद्घाटन केले. यावेळी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल डॉ. विजय कुमार सिंग (निवृत्त) हे ही उपस्थित होते.
या नवीन हवाई मार्गामुळे प्रादेशिक संपर्क वाढेल आणि या दोन शहरांमधील व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनाला चालना मिळेल. 7 जानेवारी 2023 पासून ही विमान सेवा आठवड्यातून सात दिवस चालेल.

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात दोन्ही शहरांतील रहिवाशांचे अभिनंदन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत भारतीय नागरी उड्डाण क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाल्याचे सांगितले. 2014 पर्यंत देशात फक्त 74 विमानतळ होते, आज हेलीपोर्ट आणि वॉटर एरोड्रोमसह ही संख्या 148 पर्यंत वाढली असून गेल्या आठ वर्षांत 100% वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना साथीच्यापूर्वी एका दिवसात चार लाख वीस हजार प्रवाशांनी प्रवास करण्याचा विक्रम घडला होता, आता तो विक्रम मोडीत निघाला असून एका दिवसात चार लाख पन्नास हजार प्रवाशांनी प्रवास केला. डिसेंबर 2022 मध्ये, महिन्याच्या प्रत्येक दिवशी चार लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती सिंधिया यांनी दिली.

ओडिशाच्या या शहरांमध्ये आयोजित होणाऱ्या आगामी हॉकी विश्वचषकाच्या संदर्भात मंत्री म्हणाले की, पूर्वी कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर ते बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम राउरकेला दरम्यानचा प्रवास नऊ तासांचा होता तो आता हवाई सेवेमुळे कमी होऊन एक तास दहा मिनिटे इतका होईल.
****
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1889477)
आगंतुक पटल : 234