संरक्षण मंत्रालय
युवा आदान-प्रदान कार्यक्रमाचा भाग म्हणून राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2023 मध्ये 19 मित्र देशांतील कॅडेट्स होणार सहभागी
Posted On:
06 JAN 2023 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023
दिल्ली मधील करिअप्पा परेड मैदानावर 02 जानेवारी 2023 पासून सुरू झालेल्या 74 व्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या(एनसीसी) प्रजासत्ताक दिन शिबिर 2023 मध्ये युवा देवाणघेवाण कार्यक्रमाचा भाग म्हणून 19 मित्र देशांतील कॅडेट्स (छात्र) आणि अधिकारी सहभागी होतील. एक महिना चालणाऱ्या या शिबिरात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 710 मुलींसह एकूण 2,155 छात्र सहभागी झाले आहेत. एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 06 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना, एनसीसीच्या महासंचालकांनी यांनी सांगितले की प्रजासत्ताक दिन शिबिर 2023 मध्ये सहभागी होणारे कॅडेट्स आणि अधिकारी हे 19 मित्र देशांतील आहेत ज्यात अमेरिका , ब्रिटन, अर्जेंटिना, ब्राझील, मंगोलिया, रशिया, किर्गिझ प्रजासत्ताक, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, नेपाळ, व्हिएतनाम, मालदीव, मोझांबिक, मॉरिशस, सेशेल्स, सुदान, न्यूझीलंड आणि फिजी या देशांचा समावेश आहे. कोणत्याही प्रजासत्ताक दिनाच्या शिबिरात परदेशी कॅडेट्सचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग आहे.
2155 कॅडेट्सपैकी 114 कॅडेट्स जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील आहेत आणि 120 कॅडेट्स उत्तर-पूर्व (ईशान्य) विभागातील (NER) आहेत. देशभरातून आलेल्या कॅडेट्सच्या सहभागामुळे हे शिबिर ‘मिनी इंडिया’चे प्रतिबिंब दर्शविते.
लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग म्हणाले की, शिबिरात सहभागी होणारे कॅडेट्स सांस्कृतिक स्पर्धा, राष्ट्रीय एकात्मता जागरूकता कार्यक्रम आणि विविध संस्थात्मक प्रशिक्षण स्पर्धांसारख्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होतील. 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) दोन संचलन तुकड्या सहभागी होतील. मोठी उत्सुकता असलेल्या आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या या उपक्रमांचा समारोप 28 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी पंतप्रधानांच्या रॅलीने होईल.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय राजधानीत होणाऱ्या बीटिंग द रिट्रीट आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांद्वारे कॅडेट्सचा वैयक्तिक विकास आणि त्यांची मुल्ये बळकट करत आपल्या देशाची समृद्ध संस्कृती आणि परंप रांचे दर्शन घडवणे हा प्रजासत्ताक दिन शिबिराचा मुख्य हेतू असल्याचे राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकांनी सांगितले.
N.Chitale/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1889303)
Visitor Counter : 275