सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताचा पहिलाच सर्वसमावेशकतेचा उत्सव असलेल्या पर्पल फेस्टला गोव्यात शानदार सुरुवात


केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी 'दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाशी संबंधित समस्या' या विषयावरील दोन दिवसीय संवेदना कार्यशाळेला केले संबोधित

Posted On: 06 JAN 2023 8:54PM by PIB Mumbai

पणजी, 6 जानेवारी 2023

 

भारताचा सर्वसमावेशकतेचा पहिलाच  उत्सव,असलेल्या ,  'पर्पल फेस्ट: सेलिब्रेटिंग डायव्हर्सिटी (विविधतेचा सोहळा )' या उत्सवाला आज गोव्यात शानदार सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा सरकारचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

प्रत्येकासाठी एक स्वागतार्ह आणि सर्वसमावेशक जग निर्माण करण्यासाठी आपण कसे एकत्र येऊ शकतो हे दाखवण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण  मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी दिव्यांगजनि केलेल्या उत्पादनांच्या विक्री प्रदर्शनालाही  भेट दिली आणि सहभागींशी संवाद साधला.भारतातील अशा प्रकारचा पहिलाच  सर्वसमावेशकता महोत्सव असलेल्या, पर्पल फेस्टच्या भव्य उद्‌घाटन सोहळ्याचे  ते साक्षीदार झाले.

 त्यापूर्वी , केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी गोव्यात  पर्पल फेस्ट या उत्सवाच्या  सहकार्याने आयोजित  अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणाशी संबंधित समस्या' या विषयावर दोन दिवसीय संवेदना कार्यशाळेचे उद्घाटन केले.  सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या  भूमिकेबद्दल सरकारी, बिगर -सरकारी, कॉर्पोरेट क्षेत्रांना संवेदनशील करणे आणि दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी समन्वित दृष्टीकोन ठेवणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. गोवा सरकारमधील समाज कल्याण , नदी जलवाहतूक, पुराभिलेख आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, भारत सरकारच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यावेळी उपस्थित होते.

गोवा हे पूर्वी नववर्षाच्या उत्सवासाठी  ओळखले जात होते पण आता पर्पल फेस्ट सुरू केल्याने गोवा दिव्यांगजनांच्या  सक्षमीकरणात  एक महत्वाची खुण  स्थापित करेल, असे या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सांगितले. दिव्य कला मेळा’ [दिल्ली येथे डिसेंबर 2022 मध्ये आयोजित करण्यात आला होता], तेव्हा  दिव्यांगजन उद्योजक होऊ शकतात आणि ते नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येतात, हे आम्ही अनुभवले आहे असे त्यांनी नमूद केले.

दिव्यांग  व्यक्तींच्या सबलीकरणासाठी 2016 मध्ये दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायदा लागू करण्यात आला.तेव्हापासून या कायद्याने ‘दिव्यांगजनांच्या’ जीवनात सुलभता, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता आणण्यास मदत केली आहे, असे डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सांगितले.

गोव्याने एक अनोखा पर्पल फेस्टिव्हल आयोजित केला आहे,हा महोत्सव   दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम  पुढे नेण्यासाठी सहाय्य्यकारी ठरेल , असे डॉ वीरेंद्र कुमार म्हणाले . सर्वसमावेशकतेची भावना साजरे करणारे असे उत्सव दिव्यांग व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. तसेच समाजाला त्यांच्या गरजा आणि समस्यांबाबत संवेदनशील बनवतानाच , पर्पल फेस्टिव्हल आपल्या समाजाच्या प्रगतीला  आणि विकासाला एक नवी दिशा देईल, असे त्यांनी नमूद केले.

दिव्यांगजनांसाठी सुलभतेच्या उपायोजनांमध्ये सुधारणा करणे , दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणी-संबंधित समस्या निराकरणाबाबत,सुलभतेच्या उपायोजनांमध्ये नवोन्मेष आणि कृती योजना या मुद्द्यांवर ही  दोन दिवसीय कार्यशाळा केंद्रित आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेश सरकारचे प्रतिनिधी आणि काही नामांकित स्वयंसेवी संस्थांनी कार्यशाळेत भाग घेतला.

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1889288) Visitor Counter : 240


Read this release in: English , Urdu , Hindi