अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
वर्ष अखेर आढावा 2022 : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
Posted On:
29 DEC 2022 4:54PM by PIB Mumbai
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची कामगिरी (जानेवारी ते डिसेंबर-2022)
अ. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
• स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ अंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ‘किसान भागदारी प्रथमिकता हमारी’ मोहिमेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘अन्न प्रक्रिया सप्ताह 2.0’ आयोजित करण्यात आला होता.
• केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते 75 अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे आभासी माध्यमातून उद्घाटन
पायाभूत सुविधांची निर्मिती
• एकूण 112 अन्न प्रक्रिया प्रकल्प पूर्ण/कार्यान्वीत करण्यात आले, यात - मेगा फूड पार्क: 1, शीतसाखळी : 15, कंपन्या : 71, कृषी प्रक्रिया क्लस्टर्स (एपीसी): 4, अन्न चाचणी प्रयोगशाळा : 20, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज प्रकल्प: 1 या प्रकल्पांचा समावेश
• 112 पूर्ण झालेल्या प्रकल्पांनी वार्षिक 23.08 लाख मेट्रिक टन कृषी उत्पादनाची अतिरिक्त प्रक्रिया आणि टिकवण्याची क्षमता निर्माण केली आहे.15 शीतसाखळी पायाभूत सुविधा प्रकल्पांनी अतिरिक्त दूध प्रक्रिया आणि साठवण क्षमता 23.30 लाख लिटर प्रतिदिन आणि 9.25 मेट्रिक टन /तास आयक्यूएफ (इन्स्टंट क्विक फ्रीझिंग) फळे आणि भाजीपाला प्रक्रिया आणि साठवण क्षमता तयार केली.
पूर्ण झालेल्या 112 प्रकल्पांमुळे रु. 706.04 कोटींच्या खाजगी गुंतवणुकीचा लाभ झाला आणि 25293 व्यक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला.
नवीन पायाभूत सुविधांना मान्यता
• एकूण 190 अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली उदा; कृषी प्रक्रिया क्लस्टर्स: 23, शीतसाखळी : 33, कंपन्या : 120, अन्न चाचणी प्रयोगशाळा : 12 आणि मेगा फूड पार्क: 2
I. आत्मनिर्भर भारत अभियान
II. अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआयएस).
पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या घोषणेचा एक भाग म्हणून, सरकारने 31 मार्च 2021 रोजी, 2021-2022 ते 2026-27 या सात वर्षांच्या कालावधीसाठी 10,900 कोटी रुपयांच्या खर्चासह “अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजना” हे केंद्र क्षेत्रातील योजना मंजूर केली.
जागतिक अन्न उत्पादनाच्या उत्कृष्ट उद्योग निर्मितीला पाठबळ देणे ; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय खाद्यपदार्थांच्या ब्रँड्सना समर्थन देणे; शेतीबाह्य नोकऱ्यांमधील रोजगाराच्या संधी वाढवणे; आणि शेतमालाला योग्य भाव आणि शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळवून देणे सुनिश्चित करणे ही या योजनेची
पीएम सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण (पीएमएफएमई )
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत या क्षेत्रामध्ये ‘वोकल फॉर लोकल’ला प्रोत्साहन देणे हा पीएम सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण योजनेचा उद्देश असून या अंतर्गत 2020-2025 या कालावधीत एकूण रु. 10,000 कोटी खर्चासह पत संलग्न अनुदानासह 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना पाठबळ देण्यासाठी जून 2020 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली.
ही योजना एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) दृष्टीकोनाचा अवलंब करते यामुळे कच्च्या मालाची खरेदी, सामान्य सेवांचा लाभ घेणे आणि उत्पादनांचे विपणन या बाबतीत या योजना फायदेशीर आहे.
• बीज भांडवल
• ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयांतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या सहाय्याने अन्न प्रक्रिया उपक्रमांमध्ये कार्यरत बचतगट निश्चित केले जात आहेत.
• 79,693 बचतगट सदस्यांसाठी रु. 252.53 कोटी बीज भांडवल रक्कम राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाला वितरीत करण्यात आली आहे.
• राज्य नागरी उपजीविका अभियानाला 16,159 सदस्यांसाठी रु. 56.06 कोटीची बीज भांडवल रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
• इन्क्युबेशन केंद्र:
रु. 205.95 कोटी खर्चाचे 76 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत ज्यात प्रामुख्याने राज्य कृषी विद्यापीठ, आयसीएआर -केव्हीके इ.समावेश आहे.
• पत संलग्न अनुदान:
• 58,354 वैयक्तिक अर्ज प्राप्त झाले त्यापैकी 1305.74 कोटी रुपयांची 13,638 कर्जे बँकांनी मंजूर केली. 5210 वैयक्तिक लाभार्थ्यांना पत संलग्न अनुदानाचा केंद्राचा हिस्सा 129.76 कोटी रुपये वितरीत करण्यात आला आहे.
• राज्यस्तरीय उन्नतीकरण योजना (एसएलयुपी)
• 35 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी राज्यस्तरीय उन्नतीकरण योजनेसाठी (एसएलयुपी) अभ्यास करण्यासाठी संस्था नेमल्या आहेत.
•बिहार, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेशच्या राज्यस्तरीय उन्नतीकरण योजनेला अंतिम स्वरूप मिळाले आहे.
• पीएम-एफएमई योजना संबंधित प्रोत्साहनपर उपक्रम
• पीएम-एफएमई ई-वृत्तपत्रिकेच्या 24 आवृत्त्या यशस्वीरित्या प्रकाशित झाल्या आहेत आणि 7 लाखांहून अधिक भागधारकांपर्यंत पोहोचल्या आहेत.
• राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि एनआयएफटीईएम /आयआयएफपीटी द्वारे 51 ओडीओपी वेबिनार/ऑफलाइन कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत
• पीएम-एफएमईयोजनेच्या लाभार्थ्यांच्या 69 यशोगाथा मार्च 2021 पासून आतापर्यंत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे संकेतस्थळ तसेच या मंत्रालयाच्या आणि पीएम-एफएमई समाजमाध्यमांवरील हँडलद्वारे प्रकाशित केल्या आहेत.
•या योजना-संबंधित पोस्ट नियमितपणे फेसबुक ,ट्विटर, युट्युब आणि वॉट्सऍप यांसारख्या ऍप वरील पीएम-एफएमई समाजमाध्यम हँडलवर प्रकाशित केल्या जातात
ऑपरेशन ग्रीन योजना
• मंत्रालय नोव्हेंबर, 2018 पासून प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय क्षेत्र योजना- “ऑपरेशन ग्रीन्स” राबवत आहे.अल्पकालीन हस्तक्षेप आणि दीर्घकालीन हस्तक्षेप उदा. मूल्य साखळी विकास प्रकल्प हे या योजनेचे दोन घटक आहेत.
• स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – एप्रिल 2022
• भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्यानिमित्ताने, भारत सरकार 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करत आहे. या सोहळ्याचा एक भाग म्हणून, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने 25 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ' अंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या 'किसान भागदारी प्रथमिकता हमारी' मोहिमेअंतर्गत 'अन्न प्रक्रिया सप्ताह 2.0' चे आयोजन केले होते.
•मंत्रालयाने 25 एप्रिल 2022 रोजी , समाजमाध्यम मोहिमेद्वारे ‘अन्न प्रक्रिया उद्योग सप्ताह 2.0’ सुरू करण्यात आला. या अंतर्गत मंत्रालयाच्या योजनांबाबत जनजागृती, मंत्रालयाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची यशोगाथा आठवडाभर समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्या. याशिवाय, देशभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीएमएफएमइ योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनाची प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या विषयावर ओडीओपी कार्यशाळा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
• याचप्रमाणे, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी प्रधानमंत्री किसान संपदा योजना या केंद्रीय क्षेत्र योजनेच्या 75 (पंचाहत्तर) अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन केले.
• या प्रकल्पांचा एकूण खर्च सुमारे रु. 1238 कोटी असून, मंत्रालयाने या प्रकल्पांसाठी रु. 309 कोटींच्या अनुदानाद्वारे आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे 36,000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असून सुमारे 4 लाख 63 हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
• पीएम-एफएमई योजनेअंतर्गत क्षमता बांधणी
• एनआयएफटीईएम, तंजावर ही केंद्र पुरस्कृत, नोडल राष्ट्रीय-स्तरीय तांत्रिक संस्था म्हणून काम करत आहे, क्षमता बांधणी आणि इन्क्युबेशनसाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे (पीएम एफएमई) औपचारिकीकरण तसेच कडधान्य प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, भरड धान्य प्रक्रियेमधील व्यवसायाच्या संधी, आंबा प्रक्रिया आणि मूल्यवर्धन आणि लिंबूवर्गीय प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यावर 4 ओडीओपी वेबिनार आयोजित करण्यात आले.
• केरळ कृषी विद्यापीठ, त्रिशूर, केरळ, आयआयएम नागपूर, टीएनएयु, केव्हीके मदुराई, तमिळनाडू, आयसीएआर - एनआरसीबी त्रिची, तमिळनाडू आणि एसएएसटीआरए, तंजावर, तमिळनाडू यांसाठी केंद्रीय माहिती आयोगाकडून एनआयएफटीईएम, तंजावर ही संस्था मार्गदर्शक म्हणून मान्यताप्राप्त आहे.
• मंत्रालय राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था, उद्योजकता आणि व्यवस्थापन -कुंडली प्रशिक्षण भागीदार आणि राज्यवार जिल्हा अधिकार्यांीसह पीएमएफएमइ क्षमता बांधणी पोर्टलसाठी विविध प्रात्यक्षिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत आणि योजनेच्या क्षमता बांधणी घटकासाठी डेटाबेस अद्ययावत करण्यासाठी वेब पोर्टल विकसित केले आहे.
• व्यवस्थापन माहिती प्रणालीवर एसआरएलएम आणि एसयुएलएम अधिकार्यांवसाठी 28 राज्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
• 5 विशिष्ट उत्पादनांसाठी स्वयं-शिक्षण मॉड्यूल विकसित करण्यात आले आहेत.
• संशोधन
संशोधन प्रकाशने
• सरकारी संस्थांद्वारे पुरस्कृत 17 अनुदान (जीएपी) प्रकल्प आणि 7 पुरस्कृत संशोधन प्रकल्प (एसआरपी) प्रगतीपथावर आहेत. 2022 मध्ये 6 जीएपी आणि 3 एसआरपी मंजूर करण्यात आले आहेत.
• प्राध्यापक वर्ग, विद्वान आणि विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय समीक्षकांच्या समीक्षित नियतकालिकांमध्ये 103 संशोधन लेख प्रकाशित करण्यात आले, त्यापैकी 67 संशोधन लेख 11.2 च्या सर्वोच्च प्रभाव घटकासह स्कोपस इंडेक्स्ड इम्पॅक्ट फॅक्टर नियतकालिकांमध्ये आणि 54 आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रकरणांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
• पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि विद्वानांमध्ये संशोधन कौशल्यांना चालना देण्यासाठी, एसईआरबी -कार्यशाळा, टीएआरइ आणि विरथीका योजनांनी पुरस्कृत केलेल्या पाच कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.
*****
S.Thakur/S.Chavan/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888316)
Visitor Counter : 581