राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती 3 आणि 4 जानेवारीला राजस्थान भेटीवर जाणार

Posted On: 02 JAN 2023 10:07PM by PIB Mumbai

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु उद्या आणि परवा म्हणजे येत्या 3 आणि 4 जानेवारीला राजस्थान भेटीवर जाणार आहेत.

राष्ट्रपती उद्या जयपूरच्या राजभवनातील संविधान उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत. या प्रसंगी, त्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने राजस्थानातील सौर उर्जा विभागासाठीच्या पारेषण यंत्रणेचे तसेच 1000 मेगावॉट क्षमतेच्या  बिकानेर सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती, जयपूरच्या राजभवनात राजस्थानातील विशेषत्वाने असुरक्षित आदिवासी गटसमुदायांच्या सदस्यांची भेट घेणार आहेत. उद्या संध्याकाळी, माउंट अबू येथे ब्रह्मा कुमारीतर्फे आयोजित आरआयएसई- आध्यात्मिक सक्षमीकरणातून भारताचे उत्थानया विषयावरील राष्ट्रीय अभियानाची सुरुवात देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते होणार आहे.  यावेळी राष्ट्रपती आभासी पद्धतीने तेलंगणातील ब्रह्मा कुमारी सायलेन्स रिट्रीटचे उद्घाटन आणि मध्य प्रदेशात इंदूर येथील ब्रह्मा कुमारींचे सभागृह आणि आध्यात्मिक कला दालनाची पायाभरणी देखील करणार आहेत.

राष्ट्रपती मुर्मु यांच्या हस्ते परवा, 4 जानेवारी 2023 रोजी, राजस्थानमधील पाली येथे भारत स्काऊट आणि गाईड्सच्या 18 व्या राष्ट्रीय मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888160) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu