संरक्षण मंत्रालय

एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी प्रकल्पाच्या दोन युद्धनौकांसाठी संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी आज  युद्धनौका बांधणीच्या कामाचा केला प्रारंभ

Posted On: 31 DEC 2022 10:01PM by PIB Mumbai

 

जीआरएसई, कोलकाताच्या निर्माणाधीन एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी प्रकल्पाच्या दोन युद्धनौकांसाठी (यार्ड 3033 आणि यार्ड 3036) 31 डिसेंबर 22 रोजी संरक्षण सचिव गिरीधर अरमाने, आयएएस यांनी युद्धनौका बांधणीच्या कामाचा  प्रारंभ केला.  

यावेळी बोलताना संरक्षण सचिवांनी हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्याच्या दिशेने जीआरएसई करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारतया संकल्पनेचा एक भाग म्हणून या दोन युद्धनौकांच्या पायाभरणीने पूर्णतः स्वदेशी जहाजबांधणीचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे  असे त्यांनी नमूद केले. एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी जहाजांमध्ये 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असेल, आणि हे सुनिश्चित करेल की भारतीय उत्पादन कंपन्यांद्वारे  मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन निर्मिती केली जाईल.  ज्यामुळे देशात रोजगार आणि क्षमता निर्माण होईल. एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी युद्धनौका समाविष्ट झाल्यावर भारतीय नौदलाची पाणबुडी विरोधी क्षमता आणखी वाढेल असे ते पुढे म्हणाले.

  

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1887811) Visitor Counter : 148


Read this release in: English , Urdu , Bengali