राष्ट्रपती कार्यालय

नाताळच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

Posted On: 24 DEC 2022 6:00PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाताळच्या पूर्वसंध्येला सर्व नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, "सर्व देशवासीयांना  विशेषतः ख्रिश्चन बंधू भगिनींना नाताळच्या सणाच्या माझ्याकडून शुभेच्छा."

"नाताळचा हा पवित्र सण संपूर्ण  मानव जातीसाठी शांतता आणि बंधूभावाचे प्रतीक आहे. या दिवशी आपण येशू ख्रिस्ताने दिलेल्या करुणा आणि त्यागाच्या संदेशाचे स्मरण करतो. नाताळचा सण आपल्याला एकमेकांशी प्रेमाने आणि दयाळूपणे वागण्याची प्रेरणा  देतो.

येशू ख्रिस्ताने दिलेला दैवी संदेश आपल्या जीवनात आचरण्याचा आपण सर्वजण संकल्प करूया ."

राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

***

S.Kakade/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1886356) Visitor Counter : 136