सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दहाव्या ईशान्य महोत्सवात एमएसएमई प्रदर्शनाचे उद्घाटन
Posted On:
23 DEC 2022 8:48PM by PIB Mumbai
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या दहाव्या ईशान्य महोत्सवात सूक्ष्म, लघु आणि मध्यम प्रदर्शनाचे उद्घाटन काल करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमात राणे म्हणाले की, ईशान्य महोत्सव हा ईशान्येकडील प्रदेशातील व्यावसायिक विशेषतः महिला आणि अनुसूचित जाती तसेच जमातींच्या व्यावसायिकांना आपले कौशल्य आणि उत्पादनांचे प्रदर्शन करण्याची संधी प्रदान करेल. तसेच हा महोत्सव त्यांच्यासाठी वाढीच्या आणि स्वयंपूर्ण होण्यासाठीही नव्या संधी निर्माण करेल.
23 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2022 या दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून ईशान्येकडील प्रदेशाची सर्वोत्कृष्ट संस्कृती, खाद्यपदार्थ, पर्यटन व्यवसायाची क्षमता आणि कला आणखी अनेक बाबींचे दर्शन घडवणार आहे. राणे यांनी दिल्लीनिवासींना या प्रदर्शनास भेट देऊन या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन केले.
राणे यावेळी अनेक एमएसएमई व्यावसायिकांनाही भेटले आणि ईशान्य प्रदेशाचा वेगाने विकास होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेला दृष्टीकोन आणि व्यक्त केलेली वचनबद्धता यांचा पुनरूच्चार केला.
****
M.Chopade/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886245)
Visitor Counter : 207