नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी हवाई वाहतूक आणि विमान उद्योगाशी संबंधित उत्पादन क्षेत्रात सुमारे 2,50,000 कर्मचाऱ्यांना थेट रोजगार
Posted On:
22 DEC 2022 3:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2022
भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत, देशांतर्गत झालेल्या विकासदराची आकडेवारी खालीलप्रमाणे :
वर्ष देशांतर्गत प्रवासी टक्केवारी (दर)
(दशलक्षांमध्ये ) विकास
2019-20 275 -0.3%
2020-21 105 -61.7%
2021-22 167 58.5 %
नागरी हवाई वाहतूक क्षेत्र आणि विमान उद्योगाशी संबंधित उत्पादन क्षेत्राने भारतात सध्या थेट अडीच लाख जणांना थेट रोजगार दिले आहेत. यात वैमानिक, केबिनमधील कर्मचारी, अभियंते, तंत्रज्ञ, विमानतळावरील कर्मचारी वृंद, इतर कामे करणारे कर्मचारी, मालवाहतूक कर्मचारी, किरकोळ कर्मचारी, सुरक्षा रक्षक, प्रशासकीय आणि विपणन कर्मचारी अशा सर्वांचा समावेश आहे.
येत्या तीन वर्षांत देशभरात, अखिल भारतीय प्रवासी संख्या किती वाढेल, याविषयी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने व्यक्त केलेली अंदाजे आकडेवारी खालीलप्रमाणे:
वर्ष प्रवासी (दशलक्ष संख्येत)
2023-24 371
2024-25 412
2025-26 453
कोविडच्या संकटाचा सर्वाधिक फटका आदरातिथ्य आणि हवाई वाहतूक क्षेत्रांना बसला. कोविडमुळे या क्षेत्राशी संबंधित लोकांचा महसूल आणि नफ्यावर विपरीत परिणाम झाला. गेल्या तीन वर्षांत, विविध हवाई सेवा, विमानतळे, ग्राऊंडवर काम करणारे कर्मचारी आणि मालवाहतूक अशा क्षेत्रांनी मिळवलेला महसूल याची माहिती, सोबत जोडलेल्या परिशिष्टात सविस्तर दिली आहे.
2019-20 या वर्षांत, हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासाचे प्रमाण, 2018-19 च्या तुलनेत, 23 टक्के (सुमारे) इतके होते. आणि 2020-21 या वर्षांत तर हा विकासदर सुमारे उणे 57 टक्के इतका होता.मात्र, 2020-21च्या तुलनेत, 2021-22 मध्ये विकासदाराचे प्रमाण, सुमारे 47% इतके होते.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) गेल्या तीन वर्षात कमावलेला महसूल (अंदाजे) खालीलप्रमाणे आहे:
वित्तीय वर्ष रक्कम (कोटींमध्ये )
2019-20 12,837
2020-21 4,867
2021-22 6,841
विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना खालीलप्रमाणे:
(i) भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर विमानतळ विकासकांनी येत्या पांच वर्षांत, विमानतळ क्षेत्रात विद्यमान टर्मिनल्सची दुरुस्ती विस्तार, नवीन टर्मिनल्स आणि धावपट्टीच्या बळकटीकरणासाठी अंदाजे 98,000 कोटी .च्या भांडवली खर्चाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
(ii) केंद्र सरकारने, देशात 21 ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यासाठी ‘तत्वत:’ मंजूरी दिली आहे.
(iii) प्रादेशिक संपर्क-दळणवळण योजनेअंतर्गत- उडे देश का आम नागरिक (उडान) 70 विमानतळांना जोडणारे (यात नऊ हेलिकॉप्टर्स आणि दोन जल विमानतळ यांचा समावेश) 453 हवाई मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत.
(iv) देशांतर्गत देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहौल सेवा (एमआरओ) साठी वस्तू आणि सेवा कराचा दर 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
(v) विमाने भाडयाने घेणे आणि त्यांना वित्तीय मदत देण्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
(vi) विमानतळांची देशांतर्गत क्षमता संपूर्णत: वाढवण्यात आली आहे, त्यामुळे कोविड काळापूर्वी ज्या क्षमतेने विमानतळ चालत होते , त्याच क्षमतेने आता सुरु आहेत.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल डॉ. व्ही. के. सिंह यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
N.Chitale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1885735)
Visitor Counter : 261