विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
'टेक नीव @75' या राष्ट्रीय परिषदेत सामुदायिक सामर्थ्य निर्माण करणे आणि त्यांच्या गरजेनुसार तंत्रज्ञानाची भूमिका निश्चित करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला
Posted On:
22 DEC 2022 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2022
समाजात सामर्थ्य निर्माण करण्यावर आणि लोकांचे जीवनमान आणि उपजीविका अधिक उत्तम करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाची भूमिका निश्चित करण्याच्या आवश्यकतेवर नवी दिल्लीत काल संध्याकाळी आयोजित केलेल्या 'टेक नीव @75' या राष्ट्रीय परिषदेत भर देण्यात आला.

बरेचदा गरजू आणि आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी उपाय शोधणाऱ्या लोकांकडून नवकल्पना येतात. अशा तंत्रज्ञानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि त्यातील अंतर दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. या दिशेने एकत्र काम केल्यास तंत्रज्ञानाच्या यशस्वी अंमलबजावणीकरता आवश्यक प्रयत्नांना गती मिळेल असे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव (डीएसटी) डॉ. एस चंद्रशेखर यांनी टेक नीव @75 या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
आपण स्थानिक ज्ञान प्रणालीची ताकद ओळखली पाहिजे, आणि आवश्यक त्या ज्ञानाचा अंतर्भाव मूळ प्रवाहात केला पाहिजे असे ते म्हणाले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील हस्तक्षेप, नवकल्पनांचे विपणन करणे आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नाविन्यपूर्ण यंत्रणा शोधणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय परिषद म्हणजे 'आझादी का अमृतमहोत्सव' उपक्रमांतर्गत केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभाग (DST), जैवतंत्रज्ञान विभाग (DBT), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या वर्षभर चाललेल्या 'टेक नीव @75' कार्यक्रमाचा कळस आहे. या अंतर्गत समुदायाचे प्रतिनिधी, सामाजिक परिवर्तक आणि तज्ञ मंडळी यांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्यासह अनेक महत्त्वपूर्ण उद्दिष्टे साध्य झाली तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांसाठी कसा करता येईल यासह मुख्य शिक्षणआणि पुढील मार्ग याविषयी चर्चा करण्यात आली. औपचारिक नवोन्मेष प्रणालीच्या सहकार्याने स्थानिक नवकल्पना प्रणाली मजबूत करण्यासाठी एक आरखडा देखील यावेळी निश्चित करण्यात आला.
समुदायाने एखादे तंत्रज्ञान स्वीकारण्यात सामाजिक परिवर्तक कशा प्रकारे सकारात्मक भूमिका बजावू शकतात यावर विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या एस ई ई डी विभागाचे प्रमुख डॉ. देबप्रिया दत्ता, यांनी विस्तृत माहिती दिली. तसेच समुदायाचे जीवनमान आणि उपजीविका यांच्यात सुधारणा करण्यासाठी सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर जोर दिला.

विज्ञान प्रसारच्या शास्त्रज्ञ डॉ. किंकिनी दासगुप्ता मिश्रा यांनी परिषदेदरम्यान'टेक नीव @75' या कार्यक्रमातून झालेली फलनिष्पत्ती, स्थानिय नवोन्मेष यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रारूपांचा समावेश, शाश्वत उपजीविका प्रणालीसाठी पीपीपी प्रारूपां आराखडा, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित ग्रामीण उद्योजकता विकास, स्थानिक उत्पादनांचे व्यावसायिकीकरण आणि बाजार अभिमुखता, प्रभावी क्षमतानिर्माण यंत्रणा आणि डिजिटल सक्षम उपजीविका प्रणाली याविषयी सादरीकरण केले.
टेक नीव @75'चा एक भाग म्हणून आयोजित कोलाज मेकिंग आणि व्हिडिओ मेकिंग स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या परिषदेत प्रख्यात विज्ञान चित्रपट निर्मात्यांच्या अनुभवाची देवाणघेवाण, टेक नीव @75' समन्वयकांकडून अभिप्राय आणि भविष्यातील सत्राची रूपरेषा यांचा देखील समावेश होता.
G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1885694)
Visitor Counter : 231