पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनसीआर आणि संलग्न परिसरातील हवेच्या दर्जाच्या व्यवस्थापनासंदर्भातल्या आयोगाच्या उपसमितीची तातडीची बैठक

Posted On: 19 DEC 2022 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2022

आज दुपारी चार वाजताच्या एक्यूआय अर्थात हवेच्या दर्जाच्या मानक बुलेटिननुसार दिल्लीच्या समग्र एक्यूआयने 410 चा टप्पा गाठला. एक्यूआयमध्ये अचानकपणे झालेली ही वाढ लक्षात घेऊन, जीआरएपी अर्थात श्रेणीनुसार प्रतिसाद कृती योजनेच्या अखत्यारीत कार्यरत एनसीआर आणि संलग्न परिसरातील सीएक्यूएम अर्थात हवेच्या दर्जाच्या व्यवस्थापनासाठीच्या आयोगाच्या  उपसमितीची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली. एकंदरीत सर्व हवेच्या दर्जाशी संबंधित सर्व मानकांचा समग्र आढावा घेतल्यानंतर उपसमितीच्या सदस्यांना असे आढळून आले की, एक्यूआयमध्ये अचानकपणे झालेली ही वाढ तापमानातील घसरण, थंडावलेले  वारेतसेच प्रदूषक फैलावण्यासाठी प्रतिकूल वायुवीजन गुणांक यामुळे झाली आहे आणि आयआयटीएम तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्री किंवा उद्या हवेच्या दर्जात सुधारणा होईल. सर्व संबंधित संस्थांनी जीआरएपीअंतर्गत नेमून दिलेल्या स्तर1 आणि स्तर2 च्या उपाययोजना सुरु ठेवण्याचा तसेच स्तर 3 च्या उपायांची गरज नसल्याचा सल्ला उपसमितीच्या सदस्यांनी एकमताने दिला आहे.

आयआयटीएम तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही अचानकपणे झालेली वाढ तात्पुरती असून वाऱ्यांनी वेग घेतल्यानंतर आज रात्री किंवा उद्या हवेच्या दर्जात सुधारणा होईल.

जीआरएपी तसेच एनसीआरआणि डीपीसीसीच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत उपाययोजना राबविण्यासाठी जबाबदार असणाऱ्या विविध संस्थांनी येत्या काही दिवसांमध्ये स्तर1 आणि स्तर 2 च्या कृती अधिक तीव्रतेने राबवाव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत.

जीआरएपी राबविण्यासाठी एनसीआर विभागातील नागरिकांनी सहकार्य करावे तसेच नागरिकांच्या सनदेत जीआरएपीअंतर्गत नमूद करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे असे आवाहन आयोगाने केले आहे. नागरिकांनी खालील सूचना पाळाव्यात:

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, व्यक्तिगत वाहनांचा वापर किमान प्रमाणात करावा.
  • नागरिकांनी आपापल्या वाहनांचे एअर फिल्टर योग्य कालावधीनंतर बदलून घ्यावे
  • धूळ निर्माण करणाऱ्या बांधकामासारख्या प्रक्रिया टाळाव्यात

दिल्ली आणि परिसरातील परिस्थितीवर उपसमिती सदस्यांचे बारीक लक्ष असून गरज भासली तर उद्या पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि दिल्लीच्या हवेच्या दर्जानुसार आणि आयआयटीएम तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार योग्य निर्णय घेण्यात येईल.  जीआरएपीचे सुधारित वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांना caqm.nic.in या लिंकवर क्लिक करून ते वाचता येईल.

  

 

 

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1884958) Visitor Counter : 151


Read this release in: English , Urdu , Hindi