जलशक्ती मंत्रालय
गंगा, यमुना आणि गोदावरी या नद्यांची स्वच्छता
Posted On:
19 DEC 2022 8:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2022
भारत सरकार नमामि गंगे कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक तसेच तंत्रज्ञान विषयक पाठबळ पुरवून गंगा आणि तिची प्रमुख उपनदी असलेली यमुना आणि इतर उपनद्यांमधील प्रदूषण निर्मूलनाच्या आव्हानाना तोंड देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या प्रयत्नांना मदत करत आहे.
सीपीसीबी अर्थात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गंगा, यमुना आणि गोदावरी या नद्यांमधील पाण्याच्या दर्जाचे परीक्षण करण्यात येत असून वर्ष 2016 आणि 2017 मध्ये गोळा केलेल्या नदीजलाच्या दर्जासंबंधी माहितीच्या आधारावर मंडळाने या नद्यांच्या प्रवाहामधील सर्वाधिक प्रदूषित भाग 2018 मध्ये निश्चित केले आहेत. वर्ष 2018 मध्ये गंगा, यमुना आणि गोदावरी या नद्यांच्या बीओडी मानकांवर आधारित सर्वाधिक प्रदूषित भागांची यादी तसेच श्रेणीनुसार बीओडी मूल्य आणि प्राधान्य वर्ग यांचे तपशील परिशिष्ट क्र. 1 मध्ये दिले आहेत.
आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांमधील गोदावरी नदीच्या प्रवाहातील प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत एकूण 207.41 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये एकूण 185.46 एमएलडी क्षमतेची 10 सांडपाणी प्रक्रिया केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. आंध्रप्रदेशात राजामुंद्री, महाराष्ट्रात नांदेड, नाशिक आणि त्रंबकेश्वर तर तेलंगणा राज्यात बद्रचलम, मांचेरिअल आणि रामगुंडम अशा सात शहरांमध्ये ही केंद्रे उभारण्यात आली आहेत.
नद्यांची स्वच्छता ही सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे. गंगा, यमुना आणि गोदावरी या नद्यांसह देशातील एकूण 351 प्रदूषित नदी प्रवाहांचा कायापालट करण्यासाठी संबंधित राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रशासनांनी स्थापन केलेल्या चार सदस्यीय “नदी कायापालट समिती”ने कृती योजना तयार केली. यासाठी सर्व संबंधित राज्य सरकारांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यावरणविषयक मुख्य सचिवांचे समग्र पर्यवेक्षण आणि समन्वय उपयुक्त ठरले.
केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी आज राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
ANNEXURE – I
Polluted river stretches identified on river – Ganga, Yamuna and Godavari during 2018
River
|
State
|
Identified Polluted River Stretch
|
BOD range/ Value
|
Priority Class
|
GANGA
|
UTTARAKHAND
|
HARIDWAR TO SULTANPUR
|
6.6
|
IV
|
UTTAR PRADESH
|
KANNAUJ TO VARANASI
|
3.5-8.8
|
IV
|
BIHAR
|
BUXAR TO BHAGALPUR
|
3.2 - 4.2
|
V
|
WEST BENGAL
|
TRIBENI TO DIAMOND HARBOUR
|
5.0-12.2
|
III
|
YAMUNA
|
HARYANA
|
PANIPAT TO SONEPAT
|
4 – 55.0
|
I
|
DELHI
|
WAZIRABAD TO ASGARPUR
|
9 - 80
|
I
|
UTTAR PRADESH
|
SHAHPUR TO ALLAHABAD (BALUA GHAT)
|
12.0-55
|
I
|
GODAVARI
|
MAHARASHTRA
|
SOMESHWAR TEMPLE TO RAHED
|
5.0-88
|
I
|
ANDHRA PRADESH
|
RAYANPETA TO RAJAHMUNDRI
|
3.1 - 3.4
|
V
|
TELANGANA
|
BASAR TO KHAMMAM
|
4.0-9.0
|
IV
|
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1884940)