वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराची (भारत - ऑस्ट्रेलिया ईसीटीए ) 29 डिसेंबर 2022 पासून अंमलबजावणी
Posted On:
16 DEC 2022 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022
भारत आणि ऑस्ट्रेलियाने 2 एप्रिल, 2022 रोजी भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर (भारत - ऑस्ट्रेलिया ईसीटीए) स्वाक्षरी केली आहे, 29.12.2022 पासून या कराराची अंमलबजावणी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने 100% शुल्क व्यवस्थेवर प्रदान केलेल्या प्राधान्यक्रमाच्या शून्य शुल्क बाजारपेठेतील प्रवेशाचा भारतीय निर्यातीला फायदा होईल . याचा फायदा भारतातील रत्ने आणि दागिने, कापड, चामडे, पादत्राणे, फर्निचर, अन्न आणि कृषी उत्पादने, अभियांत्रिकी उत्पादने, वैद्यकीय उपकरणे आणि वाहन यांसारख्या श्रम-केंद्रित क्षेत्रांना होईल. दुसरीकडे, भारताने आपल्या देशांतर्गत उत्पादन उद्योगासाठी आवश्यक असलेल्या कच्चा माल आणि कोळसा, खनिज धातू इत्यादींसारख्या मध्यस्थ असलेल्या 70% पेक्षा अधिक शुल्क व्यवस्थेवर ऑस्ट्रेलियाला प्राधान्य दिले आहे. या शिवाय, ऑस्ट्रेलियाने शेफ आणि योग शिक्षकांसह भारतीय व्यावसायिकांसाठी अतिरिक्त बाजारपेठ प्रवेश आणि वाहतूक सुविधा देखील प्रदान केली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
S.Kakade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1884320)