रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध

Posted On: 14 DEC 2022 6:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2022

राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातग्रस्तांना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) राष्ट्रीय महामार्गांवर दर 50 किमी अंतरावर किंवा टोलनाक्यांवर 900 पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांच्या ठिकाणी आणि महामार्गाच्या बाजूला पोस्टर्स/होर्डींग्सच्या माध्यमातून 1033 या मदत क्रमांकाबद्दल जनजागृती करण्याच्या सूचना एनएचएआय ने दिल्या आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

  

 

 

 

 

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1884223) अभ्यागत कक्ष : 215
Read this releasein: English , Urdu