संरक्षण मंत्रालय
जमिनीच्या वादांचे निराकरण करण्यासाठी बळकट अंतर्गत कायदा व्यवस्था आणि कायद्यातील कौशल्य महत्वाचे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संरक्षण संपदा दिनानिमित्त संरक्षण संपदा महासंचालनालयाच्या ( डीजीडीई) वतीने आयोजित कार्यक्रमाला संरक्षण मंत्र्यांनी केले संबोधित
Posted On:
16 DEC 2022 4:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2022
जमिनीशी संबंधित अनावश्यक वादांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी अंतर्गत कायदा व्यवस्था बळकट करणे आणि राज्य जमीन महसूल कायद्यांमध्ये कौशल्य प्राप्त करणे महत्वाचे आहे असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संपदा महासंचालनालयाला केले. नवी दिल्ली येथे 16 डिसेंबर 2022 रोजी संरक्षण संपदा दिनाच्या कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केले. काही घटक काही वेळा जमीन आणि मालमत्तेशी संबंधित खोटी कागदपत्रे तयार करून आणि कायदेशीर त्रुटींचा फायदा घेत सरकारी जमिनीवर अतिक्रमण करतात, परिणामी वर्षानुवर्षे खटला चालतो. या प्रक्रियेत वाया जाणारा वेळ, पैसा आणि ऊर्जा टाळली पाहिजे आणि अशा समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने सदैव तयार राहण्यासाठी डीजीडीईने स्वत:ला सुसज्ज केले पाहिजे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
संरक्षण विभागाच्या जमिनीची देखभाल आणि व्यवस्थापन हे राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यांपैकी एक असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले.
देशभरातील छावण्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संरक्षण विभागाच्याच जमिनीवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण शोधण्यासाठी डीजीडीईने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सॉफ्टवेअरचा विशेष उल्लेख राजनाथ सिंह यांनी केला.नागरिकांच्या डिजिटल सक्षमीकरणाच्या श्रेणी अंतर्गत डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 साठी ई-छावणी सॉफ्टवेअरची निवड करण्यात आल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले.
संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमात सुविद्या (SUVIDYA) (बहुभाषिक कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळा व्यवस्थापन मॉड्यूल) आणि भूमी रक्षा (अतिक्रमण हटाव मॉड्यूल) यांचे उद्घाटन देखील करण्यात आले.
संरक्षणमंत्री उत्कृष्टता पुरस्कार
राजनाथ सिंह यांनी सार्वजनिक सेवा आणि जमीन व्यवस्थापनासह आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या क्षेत्रातील नवोन्मेष आणि डिजिटल क्षेत्रातील कामगिरीसाठी संरक्षण मंत्री उत्कृष्टता पुरस्कार प्रदान केले. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील देवळाली छावणी मंडळाला ‘ई-छावणी’ प्रकल्पाची अंमलबजावणी केल्याच्या कामगिरीसाठी संरक्षणमंत्री उत्कृष्टता पुरस्काराने गौरवण्यात आले.
S No
|
Award
|
Winner
|
1
|
Swachha Chhawani Swastha Chhawani
|
Category A - Cantt Board, Delhi
Category B - Cantt Board, Bareilly
Category C - Cantt Board, Bakloh
|
2
|
Digital Accomplishments
|
DEO, Delhi Circle
|
3
|
Land and Record Management
|
DEO, Chennai Circle
|
4
|
Improvement in Cantonment General Hospital
|
Cantonment Board, Allahabad
|
5
|
Implementation of ‘e-Chhawani’ Project
|
Cantonment Board, Deolali
|
6
|
Maintaining Centres for Divyang Children
|
Cantonment Board, Allahabad
|
7
|
Improvement in the functioning of Cantt Boards Schools (Primary/Middle Schools)
|
Cantt Board, Mhow
|
8
|
Improvement in the functioning of Cantt Boards Schools (Secondary & Sr. Secondary Schools)
|
Cantt Board, Jalandhar
|
2020 आणि 2021 मध्ये, कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेता, दिव्यांग मुलांसाठी केंद्रे सुरु ठेवण्यासाठी आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी दोन श्रेणींमध्ये संरक्षण मंत्री उत्कृष्टता पुरस्कार पुरस्कार देण्यात आले नाहीत. यंदापासून पुन्हा हे पुरस्कार देण्याचे सुरु करण्यात आले आहे.
S.Kakade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1884135)
Visitor Counter : 246