जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालये

Posted On: 15 DEC 2022 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2022

 

स्वच्छ भारत अभियान  (ग्रामीण) 2 ऑक्टोबर, 2014 रोजी सरकारद्वारे सुरू करण्यात आले होते. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत सर्व ग्रामीण कुटुंबांना शौचालये उपलब्ध करून देऊन देशाला हागणदारी मुक्त (ODF) बनवणे आहे. सर्व गावांनी 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वत:ला हागणदारी मुक्त (ODF) घोषित केले होते. तथापि, राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना या कार्यक्रमांतर्गत वंचित राहिलेल्या कोणत्याही कुटुंबांला लाभ मिळवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला होता. हागणदारी मुक्त दर्जा प्राप्त केल्यानंतर, 1 एप्रिल 2020 पासून स्वच्छ भारत अभियान  (ग्रामीण)  चा दुसरा टप्पा सुरू  करण्यात आला आहे. या टप्प्यात हागणदारी मुक्त स्थिती टिकवून ठेवणे, सर्व गावांना घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन (SLWM) अंमलात आणणे म्हणजेच 2024-25 पर्यंत हागणदारी मुक्त यासह कचरा व्यवस्थापक (ODF - ODF +) स्थितीमध्ये गावे रुपांतरित करण्यावर भर दिला जाणार आहे.   

पेयजल आणि स्वच्छता विभागाने स्वतंत्र संस्थेकडून   केलेल्या, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण, 2022 च्या निष्कर्षांनुसार 95.4% कुटुंबांना शौचालये उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे.

स्वच्छ भारत अभियान , दुसरा टप्पा (SBM(G) फेज-II) अंतर्गत, नवीन किंवा वंचित कुटुंबांसाठी वैयक्तिक घरगुती शौचालये (IHHL) बांधण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. ऑनलाइन इंटिग्रेटेड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमवर राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालानुसार, 2 ऑक्टोबर 2014 रोजी  अभियान सुरू   झाल्यापासून आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत 11.09 कोटी वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. राज्य/ केंद्रशासित प्रदेशानिहाय तपशील परिशिष्टात दिलेला आहे.

ही माहिती जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

परिशिष्ट:

State/UT-wise, No. of Individual household latrines (IHHLs) constructed under SBM(G) since 2.10.2014

     

S.N.

State/UT

No. of IHHLs constructed since 2.10.2014

1

A & N ISLANDS

22,527

2

ANDHRA PRADESH

42,78,472

3

ARUNACHAL PRADESH

1,48,035

4

ASSAM

41,14,535

5

BIHAR

1,23,46,133

6

CHHATTISGARH

34,55,947

7

D & N HAVELI AND DAMAN & DIU

22,562

8

GOA

28,637

9

GUJARAT

42,36,276

10

HARYANA

6,94,800

11

HIMACHAL PRADESH

2,03,695

12

JAMMU & KASHMIR

13,13,302

13

JHARKHAND

41,56,776

14

KARNATAKA

46,32,294

15

KERALA

2,43,492

16

LADAKH

18,516

17

LAKSHADWEEP

0

18

MADHYA PRADESH

73,03,605

19

MAHARASHTRA

69,13,882

20

MANIPUR

2,72,354

21

MEGHALAYA

2,91,499

22

MIZORAM

46,125

23

NAGALAND

1,49,242

24

ODISHA

72,13,828

25

PUDUCHERRY

29,695

26

PUNJAB

5,32,730

27

RAJASTHAN

82,94,142

28

SIKKIM

13,878

29

TAMIL NADU

55,51,973

30

TELANGANA

31,07,081

31

TRIPURA

4,53,808

32

UTTAR PRADESH

2,25,58,260

33

UTTARAKHAND

5,31,218

34

WEST BENGAL

77,22,817

 

GRAND TOTAL

11,09,02,136

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1883904)
Read this release in: English , Urdu