दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

26 डिसेंबर 2022 रोजी 121 व्या डाक अदालतीचे होणार आयोजन: महाराष्ट्र आणि गोव्यातील टपाल सेवांबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार


ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी 16 डिसेंबर 2022 पर्यंत मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांच्याकडे पाठवाव्यात

Posted On: 14 DEC 2022 4:19PM by PIB Mumbai

मुंबई, 14 डिसेंबर 2022

मुख्य  पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई 400001 यांच्या वतीने 26 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 03:00 वाजता, 2 रा मजला,जीपीओ  इमारत, मुंबई - 400001 येथील  कार्यालयात 121 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ज्यांचे 6 आठवड्यांच्या आत निराकरण झाले नाही,अशा  महाराष्ट्र आणि गोवा राज्यांशी संबंधित टपाल सेवांसंबंधीच्या तक्रारी/समस्यांचे निराकरण  डाक अदालतीमध्ये करण्यात येईल.

नोंदणी नसलेल्या/नोंदणीकृत मेल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँका आणि मनीऑर्डरची रक्कम प्राप्त न होणे इत्यादीं संबंधीच्या तक्रारी डाक अदालतीमध्ये विचारात घेतल्या जातील.तक्रारींमध्ये मूळ तक्रार ज्या अधिकार्‍यांकडे  करण्यात आली होती त्यांची नावे आणि पदनाम विशेषतः वस्तू /मनी ऑर्डर/बचत बँक खाती/प्रमाणपत्रे इत्यादींचे तपशील  नमूद केलेले असले पाहिजेत.

इच्छुक ग्राहक तक्रारीची दुसरी प्रत (डुप्लिकेट) म्हणून  टपाल  सेवांबाबत त्यांची तक्रार सहाय्यक संचालक टपाल  सेवा (पीजी) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, दुसरा मजला, जीपीओ इमारत , मुंबई - 400001 यांच्याकडे 16.12.2022 पर्यंत  पाठवू शकतात.

टपाल  सेवा देशाच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग असून  आभासीरित्या   प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला स्पर्श करतात. टपाल  विभाग आपल्या ग्राहकांना  पूर्णपणे  समाधान करणाऱ्या  सेवा प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, विसंवाद  आणि सेवेतील  दोष अधूनमधून घडतात, ज्यामुळे तक्रारी आणि समस्या येतात. तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी विभागाकडून वेळोवेळी डाक अदालत आयोजित केली जाते.यामध्ये विभागाचे अधिकारी समस्यापीडित ग्राहकांना भेटतात, त्यांच्या तक्रारींचा तपशील गोळा करतात आणि लवकरात लवकर त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

स्रोतः भारतीय टपाल विभाग

 

 

 

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 


(Release ID: 1883445) Visitor Counter : 123


Read this release in: English