वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत- इंग्लंड यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) वाटाघाटींवर चर्चेसाठी केंद्रीय वाणिज्य उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी घेतली इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री केमी बदेनॉचयांची भेट


भारत- इंग्लंड यांच्यातील मुक्त व्यापार करारविषयक वाटाघाटींसाठी आपापल्या वचनबद्धतेला मंत्र्यांनी दिली पुष्टी

भारत- इंग्लंड मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील नोकऱ्या, गुंतवणूक आणि निर्यातीला चालना मिळणार

Posted On: 13 DEC 2022 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2022

 

भारत- इंग्लंड यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) वाटाघाटींवर चर्चेसाठी केंद्रीय वाणिज्य उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री केमी बदेनॉच यांची भेट घेतली.

भारत-इंग्लंड मुक्त व्यापार करार वाटाघाटी तसेच द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंधांची व्याप्ती यावर या दोघांनी चर्चा केली. दोन्ही मंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या  भारत-इंग्लंड मुक्त व्यापार करार वाटाघाटींसाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.  त्यामुळे दोन्ही देशांमधील नोकऱ्या, गुंतवणूक आणि निर्यातीला पूर्ण क्षमतेने चालना मिळेल. भारत-इंग्लंड मुक्त व्यापार करार वाटाघाटींची 6वी फेरी सध्या नवी दिल्लीत सुरू आहे.

वाटाघाटींच्या स्थितीवर समाधान व्यक्त करताना, लवकरात लवकर निष्कर्ष काढण्याच्या उद्देशाने वाटाघाटी यापुढेही सुरू राहतील, असे मान्य करण्यात आले.  समतोल, परस्पर फायदेशीर, निष्पक्ष आणि न्याय्य परिणामासाठी परस्परसंवेदनशीलता आणि एकमेकांच्या संवेदनशीलतेचा आदर या तत्त्वावर आधारित तसेच परस्परांच्या भावनेतील मतभेद दूर करण्याच्या उद्देशाने एकत्र काम करण्याचे आवाहन मंत्र्यांनी वाटाघाटी करणाऱ्या टीमला केले.

द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही मंत्र्यांनी भारत आणि इंग्लंडमधील व्यवसायिकांशी संवाद साधला. पीयूष गोयल यांनी नमूद केले की भारत आणि ब्रिटनमधील गुंतवणूक तसेच आर्थिक संबंध आधीच मजबूत आहेत आणि वर्षानुवर्षे वाढले आहेत. भारताने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी निर्यातप्रणित   धोरण स्वीकारले आहे. भारत सरकारने उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजना, राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन, विकास वित्त संस्था आणि बिगर धोरणात्मक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खाजगीकरण यासह अनेक धोरणे आणि सुधारणा आणल्या आहेत. प्रक्रिया आणि मंजुरीचे डिजिटायझेशन, प्रक्रियांचे सुलभीकरण, जुन्या आणि पुरातन कायद्यांमधून अनावश्यक भाग काढून टाकणे इत्यादींसह व्यवसाय सुलभ करण्यासाठी विविध उपक्रम सरकारने हाती घेतले आहेत. आर्थिक समृद्धीसाठी या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी भारत आणि इंग्लंडमधील व्यवसायांना केले.

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883247) Visitor Counter : 149


Read this release in: English , Urdu , Hindi