आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस आणि पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांच्या जागांबाबतची माहिती


वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 67% वाढ होऊन त्या 387 वरून 648, एमबीबीएसच्या जागांमध्ये 87% वाढ होऊन 51348 वरून 96077 आणि पीजीच्या जागांमध्ये 105% वाढ होऊन 31185 वरून 64059 इतक्या झाल्या

Posted On: 13 DEC 2022 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2022

 

देशात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या एकूण 96,077 जागा उपलब्ध असून त्यापैकी 51,712 जागा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि 44365 जागा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहेत. देशात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) पीजी अभ्यासक्रमाच्या 49,790  जागा उपलब्ध असून, त्यापैकी 30,384 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि 19,406 खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहेत. तसेच डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड (डीएनबी) / फेलोशिप ऑफ नॅशनल बोर्डच्या (एफएनबी) पीजी अभ्यासक्रमाच्या 12,648 जागा उपलब्ध असून, त्यापैकी 4185 जागा सरकारी संस्थांमध्ये आणि 8463 खाजगी संस्थांमध्ये आहेत. त्याव्यतिरिक्त, कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (सीपीएस) मध्ये पद्व्युत्तर अभ्यासक्रमाच्या 1621 जागा आहेत. 

देशात 2014 पूर्वी 387 वैद्यकीय महाविद्यालये होती. त्यामध्ये 67% वाढ झाली असून ही संख्या आता 648 वर पोहोचली आहे. तसेच, 2014 पूर्वी देशात 51348 एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध होत्या, त्यामध्ये 87% वाढ होऊन त्या आता 96077 इतक्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, 2014 पूर्वी देशात पीजी  अभ्यासक्रमाच्या 31185 जागा होत्या, त्यामध्ये 105% वाढ झाली असून, त्याची संख्या आता 64059 वर गेली आहे.   

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरामधून ही माहिती दिली.  

 

* * *

S.Kakade/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1883244) Visitor Counter : 124


Read this release in: English , Urdu , Telugu