मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
लम्पी त्वचा रोगाच्या नियंत्रणासाठी विशेष मोहीम
Posted On:
09 DEC 2022 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2022
जनावरांमध्ये आढळून येत असलेल्या लम्पी त्वचा रोगावर नियंत्रण ठेवून या आजाराला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास विभाग देशभरातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठबळ पुरवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे. यामध्ये आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक अशा दोन्ही प्रकारच्या मदतीचा समावेश आहे. ज्या राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आढळला आहे तेथे केंद्रीय पथकांनी भेटी दिल्या असून तेथील संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी प्रत्यक्ष तसेच आभासी बैठकांचे देखील आयोजन करण्यात येत आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना लम्पी त्वचा रोगाला अटकाव करण्याबाबत लसीकरण तसेच योग्य उपचार यांच्यासह निश्चित कालावधीत लम्पी रोगावर नियंत्रण आणि प्रतिबंध याबाबत लागू करण्यासाठीच्या इतर सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचना आणि सल्ले देण्यात आले आहेत.
आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद तसेच या परिषदेशी संबंधित आयसीएआर-एनआरसीई आणि आयसीएआर-आयव्हीआरआय या शैक्षणिक संस्थांनी या रोगाच्या सक्रीय विषाणूंना क्षीण करुन एकसंध प्रकारची लम्पी-प्रोव्हॅक इंड या नावाची लस विकसित केली आहे. ही लस तयार करण्याचे तंत्रज्ञान अॅग्रीनोव्हेट इंडिया या कंपनीच्या माध्यमातून बेंगळूरू येथील बायोव्हेट तसेच हैदराबाद येथील इंडियन इम्युनोलॉजिकल्स या कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1882255)
Visitor Counter : 142