पोलाद मंत्रालय

स्पेशॅलिटी स्टीलसाठीच्या पीएलआय योजनेअंतर्गत पोलाद मंत्रालयाकडून 67 अर्जाची निवड


42,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वचनबद्धता

70,000 रोजगार निर्मिती क्षमतेसह उत्पादन क्षमता 26 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल

Posted On: 09 DEC 2022 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2022

भांडवली गुंतवणूक आकर्षित करून, रोजगार निर्मिती आणि पोलाद क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या प्रगतीला  चालना देऊन 'स्पेशालिटी स्टील'च्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी , स्पेशॅलिटी स्टीलच्या पाच वर्षांसाठी 6322 कोटीं रुपयांच्या आर्थिक खर्चाच्या उत्पादन संलग्न (पीएलआय)  योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने 22.07.2021 रोजी  मंजुरी दिली. 29.7.2021 रोजी ही योजना अधिकृत राजपत्रात अधिसूचित करण्यात आली आणि  योजनेची तपशीलवार  मार्गदर्शक तत्त्वे 20.10.2021 रोजी प्रकाशित करण्यात आली

पीएलआय योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यासाठी  15.09.2022.पर्यंत मुदत देण्यात आली होती.  35 लहान-मोठ्या पोलाद उत्पादक कंपन्यांकडून एकूण 79 अर्ज प्राप्त झाले यामध्ये त्यांनी  2030 पर्यंत 46,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि उत्पादन (डाऊनस्ट्रीम) क्षमता 28 दशलक्ष टन वाढवण्याची वचनबद्धता  दर्शवली होती

30 कंपन्यांकडून आलेल्या   67 अर्जांची निवड करण्यात आली आहे.यामुळे 26 दशलक्ष टन उत्पादन (डाऊनस्ट्रीम) क्षमताआणि 70,000 रोजगार निर्मिती क्षमतेसह  42,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल.

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1882250) Visitor Counter : 110


Read this release in: English , Urdu , Hindi