अणुऊर्जा विभाग
सायबर हल्ल्यापासून भारताची अणुऊर्जा प्रकल्प प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
08 DEC 2022 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की सायबर हल्ल्यापासून भारताची अणुऊर्जा प्रकल्प प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, या सुरक्षा उपायांमध्ये अधिकृत परवानगी , प्रमाणीकरण आणि प्रवेश नियंत्रण यंत्रणा, कठोर कॉन्फिगरेशन नियंत्रण आणि देखरेख व्यवस्था यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, इंटरनेटपासून अणुऊर्जा प्रकल्प प्रणाली वेगळी ठेवण्यात आली असून प्रशासकीय नेटवर्कवरून त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. त्याचबरोबर , अणुऊर्जा प्रकल्पांमधील प्रशासकीय नेटवर्कमध्ये माहिती सुरक्षा मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
कुडनकुलम अणु ऊर्जा प्रकल्पावर सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या सायबर हल्ल्याबाबत माहिती देताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की संगणक आणि माहिती सुरक्षा सल्लागार गट (CISAG) – DAE आणि भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद टीम CERT-इन). या राष्ट्रीय संस्थेद्वारे तपास करण्यात आला आहे. त्यांच्या शिफारशींच्या आधारे या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1881788)
Visitor Counter : 224