सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांगजनांसाठी बाधामुक्त वातावरणाची निर्मिती करणारे सर्वश्रेष्ठ राज्य ठरले महाराष्ट्र; संस्थात्मक सक्षमीकरणासाठी 2022 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला

Posted On: 03 DEC 2022 9:10PM by PIB Mumbai

 

दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना सोयीच्या ठरतील अशा भौतिक सुविधांची निर्मिती महत्त्वाची ठरते. सहज वावरण्यायोग्य भोवताल हा केवळ दिव्यांगजनांनाच नव्हे तर सर्वांनाच सोयीचा असतो. शाळा, वैद्यकिय सेवा पुरविणारी ठिकाणे, कार्यालये आदी इमारतींमध्ये व पदपथ, चौक आदी खुल्या जागांमध्ये दिव्यांगजनांना सहज वावरता यावे यासाठी सुविधा निर्माण करणे हा सुगम्य भारत अभियानाचा एक भाग आहे.

आज 3 डिसेंबर रोजी आपण आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन  दिवस साजरा करत असताना सुगम्य भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला गौरविण्यात आले आहे. वर्ष 2022 मध्ये संस्थात्मक सक्षमीकरणांतर्गत सुगम्य भारत अभियानाची अंमलबजावणीकिंवा बाधामुक्त वातावरणाची निर्मितीया गटात सर्वश्रेष्ठ राज्य पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. नवी दिल्ली इथे आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुगम्य भारत अभियानाचा भाग म्हणून राज्यातील चार महत्त्वाच्या शहरांमधील 180 सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगजनांना सहज वावरण्याजोग्या सुविधा उभारल्याबद्दल महाराष्ट्राला हा पुरस्कार देण्यात आला.

या १८० इमारतींपैकी १४२ इमारतींमध्ये, त्या दिव्यांग व्यक्तींच्या वावर आणि वापराच्या दृष्टीने सुलभ होतील असे बदल करून घ्यावेत असे प्रस्ताव याआधीच दिले गेले आहेत. तर १३७ इमारतींमध्ये याआधी नसलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करायच्या बदलांचे (रेट्रोफिटिंग) काम पूर्ण झाले आहेत. या कामांकरता केंद्र सरकारने दिलेल्या २१ कोटी ६७ लाख रुपयांच्या निधीपैकी प्रत्यक्षात १९ कोटी ३० लाख रुपये कामावर खर्च केले असल्याचं प्रमाणपत्रही केंद्र सरकारला पाठवले आहे.

उर्वरित ३८ इमारतींपैकी १५ इमारतींमध्ये करायच्या कामांचा आराखडा तसंच त्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रकही सादर केले गेले आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या वावर आणि वापराच्या दृष्टीने सुलभ इमारत, म्हणजे अशी इमारत जिथे प्रवेश करताना, वावरताना त्या इमारतीमधल्या सुविधा वापरताना दिव्यांग व्यक्तींना कोणताही अडथळा येत नाही अशी इमारत. यात इमारतीमधलं एकूण वातावरण - ज्यात इमारतीतल्या उपलब्ध सेवा सुविधा, पायऱ्या आणि उतंरंडीचा मार्ग (रॅम्प), मोकळ्या जागा (कॉरिडोअर), प्रवेशद्वार, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडायचा मार्ग, वाहनतळ (पार्किंग) अशा घटकांचा समावेश असतो, यासोबतच यात तसंच इमारतींमधल्या आणि इमारतींबाहेरच्या सेवा सुविधा ज्यात रोषणाई, दिशादर्शक आणि विविध सेवांची संकेतचिन्ह (साइनेज), धोक्याची घंट्यासंबंधीची यंत्रणा (अलार्म सिस्टम) आणि शौचालयं अशा घटकांचा समावेश असतो.

दिव्यांग व्यक्तींच्या वावर आणि वापराच्या दृष्टीने सुलभ असलेल्या इमारत निश्चीत करण्यासाठी, अशा सुलभतेसंबंधीचं वार्षिक परीक्षण होणं गरजेचं आहे. या परीक्षणांमधून त्या त्या इमारतींमध्ये निश्चित केलेल्या केलेल्या मानकांची पूर्तता झाली आहे की नाही याची खातरजमा करता येते. अशा परीक्षणातून एखादी इमारत सुलभ वापर आणि वापराच्यादृष्टीनं परीपूर्ण असल्याचं सुनिश्चित झालं की मग वार्षिक परीक्षणाची आवश्यकता उरत नाही, दुसऱ्या बाजुला अशा इमारतीच्या संरचनेत आणि व्यवस्थेत सुचवलेले आवश्यक बदल करून घेणं मात्र गरजेचं असतं. हे सगळं पार पडल्यानंतर मात्र परीपूर्ण परीक्षणे कमी वारंवारतेनं केली तरी चालू शकतात.

वावर आणि वापराच्या दृष्टीने सुलभतेसाठीची मानकं ही आंतरराष्ट्रीय मानकांशी, म्हणजे आंतरराष्ट्रीय मानक संस्थेसारख्या (ISO) संस्थांनी आखून दिलेल्या मानकांसोबत जुळणारी असायला हवीत. ही मानके ठरवताना स्थानिक संदर्भही विचारात घेणं गरजेचं आहे. इमारतीच्या बांधकामविषयक वातावरणाशी संबंधीत मानकांचा विचार केला तर  आयएसओसारख्या, .  समांतर  सुलभतेची मानके शक्य तितकी सुसंगत असली पाहिजेत. बांधलेल्या पर्यावरणाच्या संदर्भात, आयएसओ 21542:2011 मध्ये, इमारतीच्या बांधकामामध्ये - बांधकामाअंतर्गत वावर आणि सुलभतेच्या दृष्टीने निर्मीत संरचनेची उपयुक्तता याबाबत काय काय गरजेचं आहे याविषयीचं आरेखन दिलं आहे, शिवाय बांधकामकाम, एकत्र बांधणी, आवश्यक सुटे घटक आणि जोडणी यासंदर्भातल्या शिफारसीही केल्या आहेत.

***

S.Kane/R.Bedekar/T.Pawar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1880761) Visitor Counter : 199


Read this release in: English , Urdu