सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

कर्तव्यपथावर पहिल्यांदाच दिव्य कला मेळ्याचा प्रारंभ


22 राज्यांमधील 200 पेक्षा जास्त दिव्यांग त्यांच्या कौशल्याचे घडवणार दर्शन

Posted On: 02 DEC 2022 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2022

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज दिल्लीत इंडिया गेटजवळ कर्तव्य पथावर दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन केले. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक या देखील यावेळी उपस्थित होत्या. दिव्य कला मेळ्याचे 2 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून दिव्यांग कारागीर, कलाकार आणि देशभरातील कारागीरांना आपली कलाकुसर, कारागिरी यांचे दर्शन घडवण्यासाठी एक मंच उपलब्ध व्हावा या मेळ्याच्या आयोजनाचा उद्देश आहे. दिव्यांगजनांच्या आयुष्यात स्वावलंबन आणण्याचा या मेळ्याचा उद्देश असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे दिव्यांगजनांना आपली उत्पादने प्रदर्शित करण्याची आणि त्यांची विक्री करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल आणि भविष्यात मोठ्या उद्योगपतींशी संपर्क प्रस्थापित करण्याची देखील संधी मिळेल, असे ते म्हणाले. अशाच प्रकारे दिव्य कला मेळ्यांचे देशभरात आयोजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या मंत्रालयांतर्गत असलेली एनएचएफडीसी, एनबीसीएफडीसी, एनएसएफडीसी आणि एनएसकेडीएफसी ही चार वित्तीय महामंडळे मुदत कर्ज योजना आणि सूक्ष्म वित्तपुरवठा योजना या योजनांतर्गत या कारागिरांना विविध भागीदार वाहिन्यांच्या माध्यमातून अर्थसहाय्य करतील, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य प्रदेशातील राज्यांसह देशाच्या विविध भागातील  अतिशय आकर्षक उत्पादने, हस्तकला, हातमाग, वीणकाम आणि पॅकबंद खाद्यपदार्थ पाहण्याचा आणि त्यांचा आस्वाद घेण्याचा उत्साहवर्धक अनुभव मिळणार आहे. यामध्ये देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 200 दिव्यांग कारागीर, कलाकार आणि उद्योजक आपली उत्पादने आणि कौशल्ये प्रदर्शित करणार आहेत.

 

 

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 1880604) Visitor Counter : 170


Read this release in: Urdu , English , Hindi