माहिती आणि प्रसारण मंत्रालय

चित्रपट पाहण्यापेक्षा वाचन करणे हे शिकण्यासाठी अधिक ताकदीचे साधन असल्याचे अभिनेता पंकज त्रिपाठी यांचे इफ्फी 53 तील मास्टरक्लास मध्ये प्रतिपादन


विविध भूमिका साकारताना विविध पात्रांकडून तुम्ही सर्वोत्तम ते घेता आणि सर्वात वाईट असेल ते नाकारता त्यामुळे तुम्ही अधिक चांगले माणूस बनता : अभिनेता पंकज त्रिपाठी

“भावना दाखवण्याबरोबरच त्या लपवता येणे म्हणजे अभिनय”

Posted On: 21 NOV 2022 11:03PM by PIB Mumbai

#IFFIWood,21 November 2022

संगीत हे प्रेमाचे प्रतीक असेल तर त्याचा आनंद सतत घेत राहिले पाहिजे. त्याचप्रमाणे वाचन हे आयुष्यभर शिकण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम असल्यामुळे कायम वाचत राहिलं पाहिजे हे आपल्याला लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठी सांगतात तेव्हा आपल्याला ते पटते. याच विश्वासाने ते जगाला अंतर्बाह्य आणि अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील निवडक पुस्तकांचे वाचन करतात.

फक्त एवढेच नाही. पंकज त्रिपाठी यांचा अभिनय नैसर्गिकदृष्ट्या सहजसुंदर आहे. त्याची प्रेक्षकांशी लगेच नाळ जुळते. त्यांची वाचनाची आवड त्यांना बारा महिने तेरा त्रिकाळ काही तरी शिकायला मदत तर करतेच इतकेच त नाही तर चित्रपट पाहण्यापेक्षाही वाचनाचे माध्यम अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी मदत करते असे त्यांचे म्हणणे आहे.

आम्हाला हे कसे कळले असेल? 53 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील संवाद सत्रात ते सहभागी झाले. त्यातून ते अभिनेता म्हणून उलगडत गेले.  गँगस ऑफ वासेपूर सिनेमात पंकज त्रिपाठी यांनी सुलतान कुरेशीची व्यक्तिरेखा साकारली. प्रभुत्व मिळविताना सातत्याने शिकणे, चिकाटी ठेवणे आणि निरीक्षण करणे याचा पाठपुरावा ही महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी करायला लागला हे त्यांनी सांगितले. क़ुठल्याही कलेत निपुणता मिळवण्यासाठी शिकण्याची निरंतन प्रक्रिया सुरू ठेवायला लागते. त्यामागे कलाकाराची अनेक वर्षांची मेहनत असते. चिकाटी आणि मेहनतीला दुसरा पर्याय नाही. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या भोवताली चाललेल्या घडामोडी आणि जीवनाचे निरीक्षण करायलाच लागते, असे त्यांनी सांगितले. द क्राफ्ट ऑफ सिनेमा- कॅरॅक्टर डेव्हलपमेंट या परिसंवादात त्यांनी आपला हा दृष्टीकोन मांडला.

आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी आणि डाउन-टू-अर्थ व्यक्तिमत्त्वासाठी ते ओळखले जातात.  आपला पहिला चित्रपट आणि पुढचा चित्रपट यात 8 वर्षांचे अंतर होते, जीवनात आलेल्या अनिश्चिततेच्या त्या टप्प्यातही आपण कधीच अडकून पडलो नाहीत्याऐवजी अभिनयाची आवड जपून अभिनयाची कला जोपासण्यासाठी तो वेळ वापरला.

व्यक्तिमत्व विकासाविषयी त्रिपाठी यांनी त्यांची मते सांगितली. भावना दाखवणे आणि लपवणे या दोन्ही गोष्टींचे महत्त्व त्यांनी सांगितले. "अभिनयात भावना दाखवण्याप्रमाणेच त्या लपवाव्याही लागतात. अभिनयामध्ये हावभाव, कृती यांचे महत्त्व त्यामुळेच आहे.", असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पंकज त्रिपाठी यांनी ते साकारत असलेल्या व्यक्तिरेखा यांच्यातील नातं कसं आहे, तसंच हे नातं पडद्यावर जिवंतपणे साकारणातल्या अडचणी काय आहेत, याबद्दल सांगितलं. व्यक्तिरेखा वेगवेगळ्या असू शकतात,पण आव्हाने आणि कथा वेगवेगळ्या असतात. ढोबळ व्यक्तिरेखा साकारायला तुलनेने सोप्या असतात. मात्र, ज्या व्यक्तिरेखांमध्ये वेगवेगळ्या छटा असतात, त्या साकारणं थोडं अवघड असतं. कारण या सूक्ष्म भावभावना, अशा दृश्य स्वरुपात दाखवता येत नाहीत, त्यांच्या बारीक छटा, तुमच्या देहबोलीतून, डोळ्यांतून व्यक्त कराव्या लागतात.

एखादी पटकथा वाचल्यानंतर, त्यातील त्यांची व्यक्तिरेखा साकारत असतांना, ते त्यात आणखी काय भर घालतात, काय सुधारणा करतात? यावर, पंकज त्रिपाठी म्हणाले, मी नेहमी दिग्दर्शकाच्या परवानगीनेच, माझ्या व्यक्तिरेखेत सुधारणा करतो, त्यासाठी अशी सुधारणा करण्यामागे माझा नेमका हेतू काय आहे, हे मी त्यांना समजावून सांगतो. कारण दिग्दर्शक हा कोणत्याही कलाकृतीच्या जहाजाचा कॅप्टन असतो आणि मी काही सूचना किंवा सल्ला दिला, तर त्यावर त्याचा निर्णय अंतिम असतो.

एका उदयोन्मुख कलाकाराने, पंकज त्रिपाठी यांना विचारलं की, एखाद्या नवख्या कलाकाराला अभिनयाचं प्रशिक्षण कितपत उपयुक्त ठरू शकेल, यावर उत्तर देतांना, त्यांनी सांगितलं की, प्रशिक्षणामुळे, तुम्हाला तुमच्या अभिनय कलेत सुधारणा करता येईल, पण त्यामुळे अभिनयाची संधी मिळेल की नाही, याची काहीच हमी नाही.

आपण भूमिकांची आणि चित्रपटांची  निवड कशी करता, असं विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, अभिनयाचे क्षेत्र असो किंवा वैयक्तीक आयुष्य असो, यशाचा असा काही विशिष्ट फॉर्म्युला नसतो. "मला ज्या व्यक्तिरेखा आवडतात, ज्या करण्यात आनंद मिळतो, त्याच मी निवडतो आणि करतो".

आणि यशापयाशाच्या पलीकडे जात, पंकज त्रिपाठी यांनी चित्रपटांमधल्या आपल्यात  आमूलाग्र परिवर्तन घडवण्याच्या ताकदीवरही भाष्य केले. चित्रपट आपल्याला चांगली व्यक्ती बनवतात, अस सांगत ते म्हणाले,"एक अभिनेता आणि तो साकारत असलेल्या व्यक्तिरेखेतील संबंध नेहमीच महत्वाचा असतो. तुम्ही विविध व्यक्तिरेखा साकारता तेव्हा तुम्ही एक अधिक चांगले व्यक्ती होत जाता. त्या व्यक्तिरेखेतील उत्तम ते स्वीकारता आणि  वाईट असेल ते सोडून देता"

ओटिटी प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या भूमिकांविषयी बोलतांना  आजच्या चित्रपट निर्मितीच्या नव्या युगातील ओटीटी या माध्यमाचे राजा म्हणून ओळखले जाणारे पंकज त्रिपाठी म्हणाले, "ओटीटी आज अनेक अभिनेत्यांना संधी देत आहे, आज असे कलाकार  त्यांचे सर्वस्व ओतून आपली उत्तमोत्तम कला देण्याचा प्रयत्न करत असतात."

इफ्फीमध्ये या दिग्गज कलाकाराच्या मास्टरक्लास मध्ये त्यांनी व्यक्त केलेले प्रेरणादायी विचार अनेक नवोदितांना दिशा देणारे ठरतील. या अभिनेत्याने स्टारडम ची व्याख्याच बदलून टाकली आहे, त्यांचे चाहते त्यांच्याविषयी सांगत असतात की हा अभिनेता जी व्यक्तिरेखा साकारतो, ती तो अक्षरशः जगतो.

तुम्हाला ह्या मुलाखतीत काय आवडलं, आणखी काय हवं होतं? तुमचे विचार तुम्ही सोशल मीडियावर शेअर का करत नाही? आमचा  #IFFII टॅग वापरुन आपले अभिप्राय नक्की कळवा.

 

 

 

 

 

 

 

 

 

N.Chitale/Prajna/Radhika/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1880116) Visitor Counter : 168


Read this release in: English , Hindi