माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 53 मध्ये इंडियन पॅनोरमा अंतर्गत ‘सौदी वेलक्का’चे प्रदर्शन
हा चित्रपट कोर्ट रुम ड्रामाऐवजी एक सामाजिक नाट्य म्हणून ओळखला जावा असे मला वाटते- दिग्दर्शक तरुण मूर्ती
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2022
“हा चित्रपट एक कोर्ट रुम ड्रामाऐवजी एक सामाजिक नाट्य म्हणून ओळखला जावा असे मला वाटते. ‘सौदी वेलक्का’ या माझ्या दुसऱ्या चित्रपटासोबत या महोत्सवात उपस्थित राहायला मिळाल्याचा मला अतिशय अभिमान आहे आणि त्याबद्दल अतिशय आनंद झाला आहे, असे सौदी वेलक्का या भारतीय चित्रपटाचे दिग्दर्शक तरुण मूर्ती यांनी सांगितले आहे. गोव्यामध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या इफ्फी ‘टेबल टॉक्स’ मध्ये निर्माते संदीप सेनन यांच्यासह ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
53 व्या IFFI मध्ये भारतीय पॅनोरमा विभागांतर्गत सौदी वेल्लाक्का प्रदर्शित करण्यात आला. 2 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/saudi-11G7N.jpg)
बराच काळ प्रलंबित असलेल्या एका प्रकरणासाठी न्यायालयाकडून समन्स वॉरंट मिळालेल्या 23 वर्षांच्या अभिलाष शशीधरन याची कहाणी या चित्रपटात आहे. दमछाक करणाऱ्या या न्यायालयीन प्रक्रियेत अडकलो तर गल्फ व्हिसा मिळवण्याचे आपले स्वप्न अपूर्ण राहण्याचा धोका निर्माण होण्याच्या भीतीने त्याला धक्का बसतो. सत्य काय आहे हे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यावर त्याला असे लक्षात येते की अर्नाकुलममध्ये सौदी या ठिकाणी दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादाचे एका मोठ्या प्रकरणात रुपांतर होऊन त्यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाचं आयुष्य बदलून गेलं आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/saudi-2HNX0.jpg)
कोची मधील सौदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका भागातील एका लहानशा समुदायाभोवती फिरणारं या चित्रपटाचं कथानक आहे असे निर्माते संदीप सेनन यांनी सांगितलं. एका शेजाऱ्याच्या डोक्यावर नारळ पडतो आणि त्यातून वादाला सुरुवात होते अशा प्रकारे या कथानकाचा प्रारंभ होतो. एक व्यवस्था कशा प्रकारे एक व्यक्ती, एक कुटुंब यांच्या आयुष्यावर परिणाम करते आणि एका कुटुंबाच्या भोवती फिरत राहते आणि मानवता कशी वाटचाल करते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या समुदायामधील मानवतेचा भाग देखील आपण विचारात घेतला पाहिजे. ही व्यवस्था त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात आणि पुढील काळात त्यांना घडवण्यात खूप मोठी भूमिका बजावते, असे ते म्हणाले.
या चित्रपटात एका वृद्ध महिलेला अभिनेत्री म्हणून भूमिका देण्यामध्ये असलेल्या धोक्याबाबत निर्मात्यांना विचारले असता अशा जोखमींची त्यांना सवय असल्याचे त्यांनी सांगितले. एका नव्या चेहऱ्याची या कथानकाची मागणी होती आणि त्यासाठी आम्ही अनेक वृद्ध महिलांची या भूमिकेसाठी चाचपणी केली आणि या कलाकाराची निवड केली.
* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1879511)
Visitor Counter : 168