माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“ज्यांची पूजा केली पाहिजे असे केवळ दोन देव आहेत, सिनेछायाचित्रकाराला हवी असलेली संधी आणि आणि चित्रणासाठी आवश्यक प्रकाश”: अनिल मेहता
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2022
“ज्यांची पूजा केली पाहिजे असे केवळ दोन देव आहेत- संधी आणि प्रकाश”
“जोपर्यंत आपण त्यांचे निरीक्षण करत नाही, तोपर्यंत वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती असे काही नसते”
“निरीक्षणाची आपली कृती, वस्तुस्थिती सुद्धा बदलू शकते”
अशी काही उद्बोधक वचने, राष्ट्रीय पुरस्कार विजेते (सिनेछायाचित्रकार) सिनेमॅटोग्राफर, लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अनिल मेहता यांनी " सिनेछायाचित्रकाराचे आयुष्य परिभाषित करणारे सुविचार” म्हणून सांगितली.
गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या इफ्फी दरम्यान, आज ‘गायडिंग लाईट्स’ या शीर्षकाखालील मास्टरक्लासमध्ये, अनिल मेहता यांनी, एका सिनेछायाचित्रकाराला भावणाऱ्या प्रतिमा कशा असतात, याचे वर्णन केले. प्रत्यक्ष व्यवहारात कां करतांना, सिनेछायाचित्रकाराला, अस्पष्टता, संधी, एखाद्या गोष्टीचा अन्वयार्थ आणि वैयक्तिक निवडी अशा गोष्टी मार्गदर्शक ठरत असतात, असे त्यांनी सांगितले.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/anil-1FC11.jpg)
मेहता यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिनेछायाचित्रण केले आहे. त्यात लगान (2001), साथिया (2002), कल हो ना हो (2003), वीर-ज़ारा (2004), कभी अलविदा ना कहना (2006) आणि ए दिल है मुश्किल (2016) अशा चित्रपटांचा समावेश आहे.
सिनेछायाचित्रणाची भाषाच वेगळी असते, असे ते म्हणाले. प्रमाण किंवा संख्येत अडकून राहणे, म्हणजे सिनेछायाचित्रण नाही, अशा भावना मेहता यांनी व्यक्त केल्या.
डीओपी साठी(DoP) सर्वात मौल्यवान असं सल्ला कोणता द्याल? यावर उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, की तुमच्या दिग्दर्शकाशी आधी तुम्ही मोकळेपणे संवाद सुरु करा आणि त्यातही ते काय म्हणतात हे लक्षपूर्वक ऐका. सिनेछायाचित्रण हे वरवर पाहता, तुम्ही किती जास्त लोकांशी बोलता, तुमच्या संसाधनांचा किती वापर करता आणि आपली कामे यशस्वी करुन घेता, असे तंत्र वाटत असले तरीही तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकता यावर त्याचे यश अवलंबून असते,” असेही मेहता म्हणाले.
भारतातील व्हर्च्युअल निर्मितीबद्दल अनिल मेहता म्हणाले, "की ही व्हर्च्युअल निर्मिती प्रक्रिया नेमकी कुठे जाईल हे जाणून घेण्यासाठी आपण अद्याप त्यावर पुरेसे काम केलेले नाही.”
मेहता यांनी खामोशी, बदलापूर आणि सुई-धागा यांसारख्या त्यांच्या काही प्रसिद्ध चित्रपटांचे डीओपी पॉइंट-ऑफ-व्ह्यू यावेळी विशद केले. त्यांनी नवोदित सिनेमॅटोग्राफर/ डीओपी यांच्यासोबत शेअर केलेले काही विचार:
- "डीओपीने पटकथा वाचायला सुरुवात केल्यापासून कॅमेरा कसा ठेवायचा याचा विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे."
- "जर तुम्हाला दृश्याची जाणीव असेल आणि काय करायचे हे माहित असेल तर तुमचे अर्धे काम झाले आहे."
- "एखाद्या दृश्याचा नाद/ताल कसा आहे, ते केवळ सिनेछायाचित्रकारालाच समजू शकते."
- "चित्रीकरण करतांना कधीतरीच, एखादे दृश्य समोर येते."
- अनिल मेहता यांना व्यक्तिशः त्यांना स्टोरीबोर्ड बनवायला आवडत नाही, असे त्यांनी सांगितले.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/anil-2RT5P.jpg)
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1879408)
Visitor Counter : 441