आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बालकांमध्ये गोवर रुग्णांच्या वाढत्या संख्येची मोजणी आणि व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने रांची (झारखंड), अहमदाबाद (गुजरात) आणि मलप्पुरम (केरळ) येथे उच्चस्तरीय पथके केली तैनात

Posted On: 23 NOV 2022 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2022

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रांची (झारखंड), अहमदाबाद (गुजरात) आणि मलप्पुरम (केरळ) येथे गोवर आजाराच्या वाढत्या रूग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी उच्च-स्तरीय 3-सदस्यीय पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पथके राज्य आरोग्य प्राधिकरणांना सार्वजनिक आरोग्य उपाययोजना राबविण्यासाठी मदत करतील तसेच आवश्यक नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय  अमलात आणणार आहेत.

रांचीला जाणाऱ्या केंद्रीय पथकात नवी दिल्लीच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटल (आरएमएलएच)च्या तज्ञांचा समावेश आहे. अहमदाबादला जाणऱ्या केंद्रीय पथकात मुंबईच्या पीएचओ, नवी दिल्लीच्या कलावती सरन चिल्ड्रन हॉस्पिटल (केएससीएच), आणि अहमदाबादच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रादेशिक कार्यालयाचे तज्ज्ञ आहेत. तर मलप्पुरमच्या पथकात तिरुवनंतपुरमच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रादेशिक कार्यालय, पाँडिचेरीच्या जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (जेआयपीएमइआर), आणि नवी दिल्लीच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज (एलएचएमसी), मधील तज्ज्ञांचा समावेश असेल. झारखंड, गुजरात आणि केरळच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रादेशिक कार्यालयाचे वरिष्ठ प्रादेशिक संचालक दौऱ्यांबाबत संबंधित पथकांशी समन्वय साधतील.

या प्रादुर्भावाची तपासणी करण्यासाठी ही पथके त्या त्या क्षेत्रात प्रत्यक्ष जातील. सार्वजनिक पातळीवर आरोग्य उपाययोजनेसाठी ही पथके राज्य आरोग्य विभागांना मदत करणार आहेत. तीन शहरांमध्ये गोवर रूग्णांच्या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉलच्या संदर्भात उपाय सुचविण्याचे कामही ही पथके करतील. गोवर झालेल्या रूग्णांचा शोध घेण्यासाठी राज्यांशी आणि सापडलेल्या रूग्णांच्या चाचणीसाठी विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांशी (व्हीआरडीएल) ही पथके समन्वय साधतील.

 

 

S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1878382) Visitor Counter : 143