माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सिनेमॅटिक साहसी प्रवास करण्यास तयार आहात का?
अरुणा जयवर्धन दिग्दर्शित श्रीलंकन चित्रपट "मारिया: द ओशन एंजल" इफ्फी 53 मध्ये गोल्डन पीकॉक पुरस्काराच्या स्पर्धेत
गोवा/मुंबई, 23 नोव्हेंबर 2022
1901 मध्ये श्रीलंकेचा (त्यावेळी सिलोन म्हटल्या जाणार्या) सिनेमाशी पहिल्यांदा परिचय झाला. ब्रिटीश गव्हर्नर वेस्ट रिजवे आणि दुसऱ्या बोअर युद्धातील कैद्यांसाठी एका खाजगी स्क्रीनिंगद्वारे देशात प्रथमच चित्रपट दाखवला गेला. बोअर युद्धातील ब्रिटीश विजय, राणी व्हिक्टोरियाचे दफन आणि एडवर्ड सातवा याचा राज्याभिषेक या घटनांची माहिती देणारा हा एक लघुपट होता. वसाहतवादाच्या छायेतून बाहेर येत सुमारे 2 कोटी 20 लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्या बेटावरील देशातील करमणूक उद्योगाने आता खूप मोठा पल्ला गाठला आहे. श्रीलंकेतील सिनेमा आता सार्वजनिक बाब आणि संस्कृतीचा उत्सव बनला आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/srilanka-1UEQS.jpg)
53 व्या इफ्फी महोत्सवात मारिया: द ओशन एंजल (2022) हा अरुणा जयवर्धन दिग्दर्शित श्रीलंकन चित्रपट आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणी अंतर्गत प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कारासाठी स्पर्धा करत आहे. हा चित्रपट समुद्राच्या मध्यावर गेलेल्या मच्छिमारांच्या समूहाभोवती आणि त्यांना अपघाताने लागलेल्या शोधाभोवती फिरतो. हा दैवी हस्तक्षेप आहे का? की ते फक्त त्यांना स्वतःला आणि एकमेकांना वेगवेगळ्या प्रकाशात पाहू लागले आहेत? मारिया: द ओशन एंजल तरुण मुलांसह समुद्रात प्रवास करतो तेव्हा गतिशीलता आणि आणखी बरेच काही शोधून काढतो. श्रीलंकन चित्रपटसृष्टीचे जनक मानल्या जाणार्या लेस्टर जेम्स पेरीस यांच्या ‘गंपेरलिया’ (1963) या चित्रपटाला इफ्फीत फिचर फिल्मसाठी पहिला गोल्डन पीकॉक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता ५३ व्या इफ्फीत इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? हे लवकरच समजेल पण तोपर्यंत सिनेमॅटिक साहसी प्रवासासाठी सज्ज व्हा आणि मारिया: द ओशन एंजेलचे स्क्रीनिंग चुकवू नका.
इफ्फी बद्दल
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) हा आशियातील सर्वात प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक असून तो 1952 मध्ये सुरू झाला. चित्रपट, चित्रपटांनी सांगितलेल्या कथा आणि त्यांच्या निर्मितीत सहभागी असलेल्या लोकांबरोबर चित्रपट साजरे करणे ही . भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामागची कल्पना आहे. चित्रपटांबद्दलचे उत्कट प्रेम, कौतुक - दूरवर, व्यापकपणे आणि खोलवर वाढवण्यासाठी त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न इफ्फी महोत्सव करतो; लोकांमध्ये प्रेम, समंजसपणा आणि बंधुभावाचे पूल बांधण्यासाठी; आणि वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेची नवीन शिखरे गाठण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे हाही त्यामागचा हेतू आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून दरवर्षी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि गोवा सरकारच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित केला जातो. ५३ व्या इफ्फीचे सर्व संबंधित अपडेट्स महोत्सवाच्या वेबसाइट www.iffigoa.org, पीआयबीचे संकेतस्थळ (pib.gov.in), वर, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील इफ्फीचे सोशल मीडिया खाते आणि पीआयबी गोवाच्या सोशल मीडिया हँडलवर मिळू शकतात. सोबत राहा, आपण सिनेमॅटिक सेलिब्रेशनचा मनमुराद आनंद घेऊया आणि आनंद शेअरही करूया.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/P.Jambhekar/D.Rane
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878375)
Visitor Counter : 213