मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

मत्स्यव्यवसाय विभागाने दमण येथे ‘जागतिक मत्स्यव्यवसाय दिन’ साजरा केला

Posted On: 21 NOV 2022 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  नोव्हेंबर 2022

केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभाग आणि राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाने आज दमण येथील स्वामी विवेकानंद सभागृहात 'जागतिक मत्स्यव्यवसाय दिनसाजरा केला.

जागतिक मत्स्यव्यवसाय दिनाच्या कार्यक्रमादरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव  जितेंद्र नाथ स्वेन  यांनी गुजराती भाषेतील  "सागर परिक्रमा गीत" प्रकाशित  केले तसेच CIFNET, NFDB आणि मत्स्यव्यवसाय सांख्यिकी-2022 वरील पुस्तिकेसह मत्स्यव्यवसाय विभागाच्या 5 पुस्तकांचेयशोगाथा  (इंग्रजी आणि हिंदी)मासेमारी नौकावरील दळणवळण आणि दिशादर्शक उपकरणे, बोटीच्या  इंजिनमधील दोष सुधारणे आणि देखभाल, मोनोफिलामेंट लाँग लाइन फिशिंग क्षमता वाढवणेट्युना ऑनबोर्डची हाताळणी  आणि सिवीड ,   कचऱ्यापासून संपत्ती आणि मूल्यवर्धनावरील इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेतील भित्तीचित्रे प्रकाशित केली.

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी राज्ये तसेच जिल्हेनिम- सरकारी संस्था/ सहकारी संस्था/ एफएफपीओ  ,शेतकरी , उबवण उद्योगांचे मालकव्यावसायिक, सर्वोत्कृष्ट अभिनव संशोधन संकल्पना/ तंत्रज्ञान अंतर्भूत करणे यासारख्या नऊ श्रेणींमधील  28  विजेत्यांना 1 ते  10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र देऊन  सन्मानित करण्यात आले. सरकारी , आणि निम- सरकारी क्षेत्रासाठी नऊ पुरस्कार तर 19 खाजगी शेतकरी/समाज/उद्योगांना सन्मानित करण्यात आले , यावेळी  पुरस्कार विजेत्यांनी त्यांचे अनुभव सांगितले.

कार्यक्रमादरम्यान, ICAR- CIFE मधील शास्त्रज्ञांच्या चर्चेसह तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते , ज्यात नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि  मत्स्यपालन व्यवस्थेच्या समस्यांवर मार्गदर्शन,  ICAR- CMFRI द्वारे ओपन सी केज कल्चर आणि कोळंबी शेतीची स्थिती आणि MPEDA द्वारे निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठेतील संधी यावर चर्चा करण्यात आली. तर Invest India द्वारे भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात गुंतवणुकीला वाव " या विषयावर पॅनेल चर्चाही झाली.  तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी, विविध संस्था/सरकारी संस्था/खाजगी क्षेत्राने 20 प्रदर्शन स्टॉल उभारले होते . ऑनलाइन टेलिकास्ट व्यतिरिक्त सुमारे 800 स्पर्धकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. मत्स्यव्यवसाय विभाग,  NFDB, राज्य/UT मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, शास्त्रज्ञ, सहकारी संस्था, शेतकरी, मच्छीमार, उद्योजक, भागधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक आणि विविध श्रेणीतील पुरस्कार विजेते यात सहभागी झाले होते.

पार्श्वभूमी:

जगभरातील सर्व मच्छिमार समुदाय , मत्स्यशेती करणारे तसेच हितधारक यांच्याप्रति दृढ ऐक्याचे प्रदर्शन करण्यासाठी दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी जागतिक मत्स्यव्यवसाय दिन साजरा केला जातो. याची सुरुवात 1997 मध्ये झाली , जेव्हा  "वर्ल्ड फोरम ऑफ फिश हार्वेस्टर्स अँड फिश वर्कर्स" ची नवी दिल्ली येथे बैठक झाली . जगभरातील  18 देशांच्या प्रतिनिधींसह "जागतिक मत्स्यपालन मंच" ची स्थापना झाली आणि शाश्वत मासेमारी पद्धती आणि धोरणांच्या जागतिक नियमांचे  समर्थन करणाऱ्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.   मासेमारीचा अतिरेक , अधिवासाचा नाश आणि आपल्या सागरी आणि गोड्या पाण्याच्या संसाधनांच्या शाश्वततेला असलेल्या  गंभीर धोक्यांकडे लक्ष वेधणे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. शाश्वत साठा आणि निरोगी परिसंस्था  सुनिश्चित करण्यासाठी जागतिक मत्स्यव्यवसायाच्या व्यवस्थापन संबंधी  पद्धती बदलण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जागतिक मत्स्यव्यवसाय दिन साजरा करण्यात येतो.

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1877850) Visitor Counter : 209


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu