सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची  वाढ आणि विकास या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले संबोधित

Posted On: 20 NOV 2022 8:00PM by PIB Mumbai

 

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी केंद्र सरकारच्या योजना आणि धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (MSME) आज, मणिपूर मध्ये इंफाळ इथे, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांची वाढ आणि विकास या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते.

परिसंवादात बोलताना, केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी, केंद्र सरकार आणि मणिपूर राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मणिपूर हे आसियान या आग्नेय आशियाई राष्ट्र समुहाचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून उदयास येईल असे ठामपणे सांगितले.  एमएसएमई मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्रांपैकी एकाची स्थापना इथे केल्यामुळे आणि नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ईशान्य भारत क्षेत्र  आणि सिक्कीममध्ये एमएसएमईला प्रोत्साहन ही  योजना सुरु केल्यामुळे, मणिपूर हे ईशान्य भारतातील  एक महत्त्वाचे आयात-निर्यात केंद्र बनण्यात मदत होईल, असे ते म्हणाले.

याप्रसंगी, एमएसएमई मंत्रालयाने मणिपूर सरकारच्या वस्त्रोद्योग, वाणिज्य, उद्योग आणि पर्यटन विभाग आणि ट्रेड रिसीव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टम (TReDS) या व्यापार प्रणालीच्या, InvoiceMart, M1Xchange आणि  RXIL या तीन उपविभागीय मंचांसोबत, सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. एमएसएमईची कामगिरी उंचावून ती अधिक गतिमान करण्यासाठी, हा करार करण्यात आला आहे.   सूक्ष्म आणि लघु उद्योगांनी, यावेळी विविध श्रेणीतील उत्पादनांचे प्रदर्शनही केले.

या कार्यक्रमाला, एमएसएमई मंत्रालय आणि मणिपूर राज्य सरकारच्या विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

***

S.Kane/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1877564) Visitor Counter : 260


Read this release in: English , Urdu , Hindi