माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पियर पाओलो पासोलिनीच्या उत्तेजक कलाकृती ठरणार यंदाच्या महोत्सवातील शतकोत्तर मैलाचा दगड


इफ्फी 53 करणार दिग्गज चित्रपट निर्मात्याला मानाचा मुजरा

Posted On: 19 NOV 2022 9:35PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 19 नोव्‍हेंबर 2022

 

एक कवी म्हणून वयाच्या 19 व्या वर्षी ज्यांच्या कविता प्रकाशित झाल्या होत्या, त्यांनी 1954 मधल्या आपल्या पहिल्या पटकथेपूर्वी, कादंबर्‍या आणि निबंध लिहिले होते. त्यांचा पहिला चित्रपट 'ऍकॅटोन' (1961) हा त्यांच्याच कादंबरीवर आधारित होता आणि त्यामुळे खळबळ उडाली. 1962 मध्ये 'Ro.Go.Pa.G.' (1963) मधील त्यांचे योगदान निंदनीय मानले गेले तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. 'द गॉस्पेल अकॉर्डिंग टू सेंट मॅथ्यू' (1964), ज्याने बायबलसंबंधीची कथा पूर्णपणे वास्तववादी शैलीत सादर केली, आणि ते पडद्यावरील ख्रिस्ताच्या काही प्रामाणिक चित्रणांपैकी एक म्हणून प्रसिद्ध झाले.

हे दिग्गज इटालियन चित्रपट-निर्माते पियर पाओलो पासोलिनी यांच्याबद्दल आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) यंदाच्या वर्षी या दिग्गज चित्रपट कर्मीला मानाचा मुजरा अर्पण करणार आहे.

 

पासोलिनी यांच्या चित्रपट कारकिर्दीत उत्कृष्ट साहित्यिक ग्रंथांचे स्पष्टपणे वैयक्तिक आणि अनेकदा निंदनीय लज्जास्पद रुपांतर दिसून आले: 'ओडिपस रेक्स' (1967); 'द डेकॅमेरॉन' (1971); 'द कँटरबरी टेल्स' (1972) आणि 'अरेबियन नाइट्स' (1974) हे त्यांचे अधिक वैयक्तिक प्रकल्प, मार्क्सवाद, नास्तिकता, फॅसिझम आणि समलैंगिकता यावर विवादास्पद विचार व्यक्त करतात. विशेषतः, 'पिग्स्टी' आणि '120 डेज ऑफ सदोम' (1975), हे  'मार्कीस डी साडे' ज्यावर इटली आणि इतर देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती, त्याचे आणि मुसोलिनीच्या फॅसिस्ट इटलीचे एक रोखता न येण्याजोगे भयंकर मिश्रण सादर करतात.

इफ्फी-53 मध्ये दाखवल्या जाणार्‍या पासोलिनीच्या काही उत्कृष्ट कलाकृती अशा आहेत:

पासोलिनी लिखित आणि दिग्दर्शित 1961 सालचा हा इटालियन नाट्य चित्रपट व्हिटोरियो ‘अॅकॅटोन’ कॅटाल्डीची कथा सांगतो. तो त्याची दीर्घकाळापासूनची मैत्रीण, मॅडलेना हिचा   दलाल (पिंप) बनून त्यावर गुजराण करतो. फसवणूक झाल्यामुळे जेव्हा ही मैत्रीण तुरुंगात जाते, तेव्हा ऍकॅटोनवर जगण्यासाठी झगडण्याची आणि आपली माजी पत्नी, असेन्झा हिच्याकडे अन्नासाठी भीक मागण्याची वेळ येते.  जेव्हा तो व्हर्जिनल स्टेलाला भेटतो, तेव्हा त्याला त्याच्या पूर्वीच्या व्यवसायात परतण्याचा मार्ग दिसतो.

ओडिपस रेक्स/एडीपो रे हा या दिग्ग्जाचा आणखी एक इटालियन चित्रपट, ज्याला जगभरातल्या विविध नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये मत्सराने प्रेरित झालेला एक पिता दिसतो, ज्याला वाटतं, की आपलं नवजात मूल आपल्यापासून आपल्या पत्नीचं प्रेम हिरावून घेईल. तो आपल्या मुलाला सोडून देण्यासाठी घेऊन निघतो, आणि एका क्षणाला चित्रपटाची पार्श्वभूमी प्राचीन ग्रीस मध्ये परिवर्तीत होते. मुलाची सुटका करून कॉरिंथ पॉलीबसचा राजा आणि राणी मेराप यांच्याकडे नेलं जातं आणि त्याला त्यांचा स्वतःचा मुलगा म्हणून वाढवलं जातं. या मुलाचं नाव ओडिपस असं ठेवलं जातं.

पिगस्टी/ पोरसिले-  1969 मध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटात दोन नाट्यमय कथा सांगण्यात आल्या आहेत. अनिश्चित भूतकाळात, एक तरुण नरभक्षक (ज्याने स्वतःच्या वडिलांचा खून केला) त्याचे तुकडे तुकडे करून काही जंगली श्वापदं निषेध व्यक्त करतात. दुसऱ्या कथेत, ज्युलियन, हा युद्धोत्तर जर्मनीमधल्या उद्योगपतीचा तरुण मुलगा, त्याच्या शेतातल्या डुकरांबरोबर शरीर संबंध प्रस्थापित करण्याचा विचार करत आहे, कारण त्याला मानवी संबंध आवडत नाहीत.

हॉक्स अँड द स्पॅरोज /Uccellacci e uccellini- 1966 चा हा चित्रपट समीक्षकांनी खूप गाजवला. या चित्रपटात टोटो आणि त्याचा मुलगा निनेट्टो रोमच्या आसपासच्या प्रदेशात  आणि ग्रामीण भागात फिरताना दाखवले आहेत. चालताना, त्यांना एका घरातून खुनानंतर एक मृतदेह बाहेर काढला जाताना दिसतो. पुढे त्यांना एक बोलणारा कावळा भेटतो, ज्याचं वर्णन आंतर-शीर्षकांमध्ये असं केलं आहे: 'ज्यांच्याकडे लक्ष नव्हते किंवा ज्यांना शंका आहे त्यांच्या फायद्यासाठी, आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की कावळा - तुम्ही म्हणता त्याप्रमाणे - पाल्मिरो टोग्लियाट्टीच्या मृत्यूपूर्वी जिवंत असलेल्यांपैकी डाव्या विचारसरणीचा आहे'.

द गॉस्पेल सेंट मॅथ्यू /Il vangelo secondo Matteo- 1964 मध्‍ये बनवलेल्‍या आंतरराष्‍ट्रीय चित्रपटांमधील एक प्रख्यात कलाकृती. चित्रपटात येशू ख्रिस्ताची कथा दाखवण्यात आली आहे. रोमन साम्राज्याच्या काळात, येशू आपल्या शिष्यांसह देशभरात फिरतो, अंधांना बरे करतो, मृतांना  जीवंत करतो आणि देवाच्या राज्याच्या आगमनाची घोषणा करतो. तो देवाचा पुत्र असल्याचा दावा करतो ज्यामुळे त्याला ज्यू नेत्यांना समोरासमोर प्रश्न विचारता येतात.  त्याला अटक केली जाते, रोमनांच्या स्वाधीन केले जाते आणि त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला जातो, ज्यामध्ये जुडियाचा रोमन गव्हर्नर त्याला निर्दोष घोषित करतो, पण तरीही, मंदिराच्या नेत्यांच्या आदेशानुसार त्याला वधस्तंभावर चढवले जाते.  

* * *

PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877381) Visitor Counter : 170


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil